Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : 5 जागा द्या नाहीतर 25 वर लढू, समाजवादी पक्षाचा महाआघाडीला इशारा

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अजून तिढा सुटलेला नाही. त्यामुळे मोठी बंडखोरी शक्यता आहे. समाजवादी पार्टीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसोबतच्या जागांच्या मागणीबाबत शेवटचा अल्टिमेटम दिला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणाले की, आम्ही पाच उमेदवार जाहीर केले असून ते विजयी होणार आहेत. हे महाविकास आघाडी लोक जितकी वाट पाहत आहेत, तितकी मी त्यांची वाट पाहू शकत नाही. जर जर महाविकास आघाडीने आम्हाला पाच जागा दिल्या नाहीत तर माझ्याकडे 25 उमेदवार तयार आहेत, ज्यांना मी निवडणुकीत उभे करणार असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

Abu Azmi

महाविकास आघाडी (MVA) यांच्यात जागावाटपावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष - काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद) आणि शिवसेना (उबाठा)- यांनी प्रत्येकी 85 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी, उर्वरित जागा वाटपावरून इतर पक्षांमध्ये वाद सुरूच आहे.

महाविकास आघाडीकडे आज दुपारपर्यंत वेळ

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी म्हणाले महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा जो गोंधळ सुरु आहे.ते चुकीचं आहे. समाजवादी पक्षाने पाच जागांची मागणी करत महाविकास आघाडीला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास सपा महाविकास आघाडीच्या बाहेर पडून 25 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. या बैठकीत आझमी यांनी सपाच्या दोन विद्यमान जागा (भिवंडी पूर्व आणि मानखुर्द) सह तीन अतिरिक्त जागा भिवंडी पश्चिम, मालेगाव आणि धुळे शहर) पाच जागांची मागणी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+