Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठरलं, अमरावतीत पुन्हा खोडके विरुद्ध देशमुख सामना! सुलभाताई महायुतीकडून तर मविआकडून सुनील देशमुख

Maharashtra Assembly Election 2024 :अमरावती विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या मतदारसंघाच्या प्रतिनिधी सुलभा खोडके यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून यावेळी त्यांना तिकीट मिळणार नाही, अशी चर्चा आहे. एवढेच नव्हे, तर सुलभाताईंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी जवळीक वाढली असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमात अजित पवार यांनी सुलभाताई आपल्या पक्षासोबत असल्याचे जाहीर सांगितले होते. याच माध्यमातून अजितदादांनी महायुतीकडून अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी सुलभाताईंची अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीही जाहीर केल्याचा अंदाज यातून काढला जात आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असू शकतात. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा खोडके विरुद्ध देशमुख ही लढत पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024

सुलभा खोडके यांचा राजकीय प्रवास

सुलभा खोडके या मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी असताना अमरावतीची जागा सोडण्यास नकार दिल्याने, त्यांनी नाईलाजाने काँग्रेसने प्रवेश केला होता. पण, नंतरही कधी त्यांचे कॉंग्रेसचे स्थानिक नेते असो की वरिष्ठ यांच्याशी फारशे पटले नाही. २०१९ च्या निवडणुकीत सुलभाताई यांनी भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री सुनील देशमुख यांचा 18 हजार 268 मतांनी पराभव केला होता.

खोडके यांना 82 हजार 581 मते मिळाली होती, तर डॉ. देशमुख यांना 64 हजार 313 मते मिळाली होती. सुनील देशमुख हे मुळचे काँग्रेसचेच आहेत, परंतु 2009 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांच्या राजकारणावर नाराज होऊन त्यांनी बंडखोरी केली होती. त्याकाळी, तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या पुत्रासाठी अमरावतीची जागा मागितली होती, आणि त्यामुळे देशमुख यांना आपल्या स्थानावरून मागे हटावे लागले. त्यानंतर त्यांनी भाजपकडे कूच केली आणि 2019 पर्यंत भाजपचे नेते म्हणून सक्रिय होते. मात्र, भाजप नेत्यांसोबत त्यांचे कधीच संबंध जुळले नाहीत, आणि 2021 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Take a Poll

काय आहे विधान परिषदेतील क्रॉस व्होटिंग प्रकरण?

सुलभा खोडके यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप झाल्याने, काँग्रेसकडून त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. यामुळे भाजपनेही त्यांना विरोध न करण्याची भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीमध्ये अजित पवार यांचा अमरावती जागेवर दावा असल्याने, भाजपही सुलभा खोडके यांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल, असे दिसते. त्यामुळे, अमरावतीमध्ये पुन्हा एकदा खोडके विरुद्ध देशमुख असा सामना रंगणार आहे.

मतदारसंघाची रचना

अमरावती विधानसभा मतदारसंघ हा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत आहे. या मतदारसंघात अमरावती महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 1 ते 5, 19 ते 31, 41 ते 56 आणि 62 ते 71 यांचा समावेश होतो. या मतदारसंघात कुणबी-मराठा मतदारांची संख्या अधिक असून, मुस्लिम आणि दलित मतदारही निर्णायक भूमिका बजावतात.

मतदार काय म्हणतात...

अमरावती शहरातील काही नागरिकांच्या मते, आमदाराने विकासकामांमध्ये अपयश मिळवले आहे. काही गावांमध्ये अजूनही नळ योजनांची अंमलबजावणी झालेली नाही, तर रस्त्यांची परिस्थिती खूपच खराब आहे. याउलट, आमदार खोडके यांच्या समर्थकांच्या मते, त्यांच्या विकास कामांच्या बळावरच त्यांना पुन्हा संधी देऊ पुन्हा एकदा विजयी करू.

जिल्ह्यातील आगामी उलथापालथ

सुलभा खोडके यांच्यावर झालेल्या क्रॉस व्होटिंगच्या आरोपामुळे आणि अजित पवार यांच्या महायुतीत असलेल्या सहभागामुळे, काँग्रेसकडून त्यांचे विधानसभेचे तिकीट निश्चितच रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+