Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Assembly Election 2024: जास्त मित्रपक्ष असूनही BJPला हव्या 2019 इतक्या हव्या! होणार अडचण

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात फोडाफोडीला फोडणी दिल्यानंतर राजकीय खिचडी तयार झाली आहे. त्यामुळे कोण कुणासोबत जाईल हे आताही सांगता येत नाही. तर दुसरीकडे राज्यात महायुती येत्या विधानसभा निवडणुकीत विजयासाठी कोणत्याही प्रयत्नांत कसर ठेवत नसल्याचे दिसून आले आहे. असे असतानाच आता भाजपला विधानसभा निवडणूकीत यंदा जास्त मित्रपक्ष असूनही, भाजपला 2019 इतक्या जागा हव्या आहेत.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकण्याचे मनसुबे पक्के आहेत. ते विजयाचा दावाही करत आहेत. त्यादृष्टीने ते तयारीलाही लागले आहेत. आपल्या मित्रपक्षांशी सध्यातरी त्यांचे संबंध ठिकठाक आहेत असे म्हणायला हरकत नाही पण जशी जागा वाटपाची चर्चा पुढे जाईल तसे तसे मित्रपक्षातील संबंधात अडचणी येऊ शकतात त्याला एक कारण म्हणजे भाजपचा जागेवरील दावा हा आहे.

Maharashtra Assembly Election 2024

किमान 155 जागा लढवण्याचे उद्दिष्ट

सत्ताधारी आघाडी महायुती आणि विरोधी आघाडी महाविकास आघाडी (एमव्हीए) यांनी पुढील महिन्याच्या सुरुवातीला अधिसूचित होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बंद दरवाजाच्या हालचालींना वेग दिला आहे. एनडीए (महायुती) - अजूनही जागावाटपावर काम करत आहे. राज्यात भाजपचे किमान 155 जागा लढवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पक्ष कठोर भूमिका आणि सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

मविआपेक्षा महायुतीला जड जाणार जागावाटप

भाजप ज्या जागेच्या संख्येवरुन दावा करत आहे, त्यानुसार विचार करता महाविकास आघाडीचे जागावाटप सोपे होऊ शकते पण महायुतीत मित्रपक्ष जास्त आहे. गेल्यावेळी शिवसेना हाच प्रमुख मित्रपक्ष होता पण यंदा मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांची राष्ट्रवादी, रासप अन् सदा खोत, बच्चू कडू यांच्यापक्षासह इतर काही पक्ष भाजपचे मित्र आहेत. त्यामुळे यंदा महायुतीला जागावाटप जड जाईल ही शक्यता आहे.

125 जागा जिंकण्याची आशा

जागावाटपाचे भाजपला अपेक्षित सूत्र निश्चित करणे सोपे नाही. 155 जागांची मागणी असलेल्या भाजपने 2024 मध्ये 125 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि ते साध्य करण्यासाठी त्यांना 155-160 जागा लढवायच्या आहेत आणि उर्वरित त्यांच्या मित्रपक्ष भागीदारांत वाटून घ्यायच्या आहेत. त्यापैकी तितकीच मागणी करणारी एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला दावा पुढे ढकलण्यात अधिक आक्रमक दिसत आहे.

भाजपला जर हव्या तेवढ्या जागा दिल्या तर गणितानुसार 123 ते 128 जागा उरतात पण शेवटी शेवटी यातल्या शंभरावर जागा एकनाथ शिंदेंना हव्या आहेत मग प्रश्न उरतो कि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा अन् इतर मित्र पक्षांच्या वाट्याला काय मिळेल..? त्यामुळे भाजपला अपेक्षित जागा यंदा मिळवाताना मोठा त्रास होऊ शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+