Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुख्यमंत्री शिंदेंचे मिशन 100+, 110 मतदारसंघांवर शिवसेनेचा डोळा, दोन दिवसांत होणार मोठा निर्णय?

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या जागा वाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल, यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने देखील जागावाटपासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू झालेल्या आहेत. अशातच महायुतीतील शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेने सुमारे 110 मतदारसंघांवर डोळा ठेवत त्या मतदारसंघांचा विशेष अभ्यास करत अहवाल तयार केलेला असून तो अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 100 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत.

दोन दिवसांत होणार या जागांवर चर्चा

काही आठवड्यांपूर्वी शिवसेनेने राज्यातील सुमारे 110 मतदारसंघात निवडणूक प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली होती. या निवडणूक प्रभारी आणि निरीक्षकांनी संबंधित मतदारसंघाचे दोनदा दौरे करत संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्या मतदारसंघाचे अभ्यासपूर्ण अहवाल तयार केले आहे. ता हे सर्व अहवाल एकनाथ शिंदेंना सादर झाले असून पुढील दोन ते तीन दिवसात सर्व प्रभारी आणि निरीक्षकांसोबत पक्ष नेतृत्व बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

Eknath shinde

जिथे सक्षम उमेदवार तिथेच लक्ष्य

दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शिवसेना म्हणून आम्ही सुमारे 110 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. म्हणूनच त्या ठिकाणी अभ्यास करून अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सोपविला गेलेला आहे. आम्ही ज्या मतदारसंघात शिवसेना यापूर्वी निवडणूक लढवत होती किंवा ज्या ठिकाणी आम्हाला अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे, अशाच मतदारसंघांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही कुठेही मित्रपक्षाचा आमदार असलेल्या जागेवर डोळा ठेवून नाही. ज्या ठिकाणी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, त्याच जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे.

भाजप सर्वाधिक जागा लढवणार?

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभेतही भाजपनं महायुतीतील घटक पक्षांपेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप सर्वाधिक आमदार असलेला पक्ष आहे. भाजपकडे 105 आमदार आहेत. महायुतीत भाजपसोबत अजित पवारांची राष्ट्रवादीची काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन पक्ष आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+