मोठी बातमी : केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा ठरला, 'या' दोन तारखा असणार महत्त्वाच्या

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा ठरला असून येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे. या दोन दिवसात राज्य निवडणूक आयोगासमवेत मेगा बैठका होतील, त्यानंतर महाराष्ट्रात कधीही निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Maharashtra Assembly Election 2024

एकीकडे राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना लागलेली आहे. तर दुसरीकडे महायुती, महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार तयारी सुरू झालेली आहे. त्यातच जरांगे पाटील फॅक्टर देखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. तर वंचितच्या वतीने तर आज चक्क उमेदवारांची यादीच जाहीर करण्यात आली.

अशातच तिसऱ्या आघाडीची देखील तयारी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. या सर्व गोंधळात आता केंद्रीय निवडणूक आयोगाची एक टीम महाराष्ट्र दौरा करून येथील निवडणुकीसंदर्भात आढावा घेणार आहे. आगामी 27 व 28 सप्टेंबर रोजी ही टीम महाराष्ट्रात येणार आहे.

त्यानंतर कधीही लागेल आचारसंहिता

राज्यातील निवडणूक आयोगाशी केंद्रीय टीम संवाद साधणार आहे. मुंबईत या संदर्भात मेगा बैठका देखील होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे या बैठकीनंतर अवघ्या काही दिवसांतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+