Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी..! संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऐन आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी अफवा पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मध्य प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडल्याचा दावा राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता संजय राऊत विरोधात गुन्हा झाला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 case has been registered against Sanjay Raut

संजय राऊत यांनी काय केला होता दावा

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टिका केली होती. मध्यप्रदेशात ही योजना बंद पडल्याचा दावा त्यांनी भाषणातून केला होता. भोपाळमधील भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांनी संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेतला. सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवली. जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सुभाषा चौहान यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनंतर संजय राऊत काय म्हणाले?

भोपाळ शहरात गुन्हा झाल्यानंतर आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी जेव्हा या गुन्ह्याबद्दल संजय राऊत यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, माझ्यावर गुन्हा दाखल केला, पण मी काय चुकीचे बोललो..? जेव्हा आम्हाला कोर्टात बोलतील. तेव्हा आम्ही सांगू... उत्तर प्रदेशमध्ये खरोखर 'लाडली बहन'ची काय स्थिती आहे, ती त्यांनी जाहीर केली पाहिजे.

महाराष्ट्रात लाडकी बहिणीच्या नावाखाली फसवा फसवी सुरू आहे. मतांसाठी लाडकी बहीण योजना ही मत विकत घेण्यासाठी योजना आहे, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, या प्रकारानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+