कामठीत पुन्हा रंगणार भाजप विरुद्ध काँग्रेस सामना! चंद्रशेखर बावनकुळे हे असू शकतात उमेदवार
Maharashtra Assembly Election 2024 BJP Vs Congress in Kamptee : कामठी विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय स्थितीवर नजर टाकल्यास, भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये यावेळीही लढत होणार असे चित्र आहे. कामठी हा नागपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, जो पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, 2004 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपसाठी विजय मिळवत येथे काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली. त्यांनी सलग तीन वेळा निवडणूक जिंकून आपली पकड अधिकच मजबूत केली होती. पण, सन 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. आता बावनकुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजप यावेळी त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, कामठीतून भाजपकडून बावनकुळे हे उमेदवार असू शकतात. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचा उमेदवार असण्याची शक्यता आहे.

1962 पासूनच कामठी मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जायचा. अनेक दशके तो काँग्रेसच्या ताब्यात राहिल्यावर 1999 मध्ये तो प्रथमच गैरकाँग्रेसी उमेदवाराकडे गेला. रिपब्लिकन पक्षाच्या तत्कालीन नेत्या सुलेखा कुंभारे यांनी त्यावेळी बाजी मारली. मात्र, त्यानंतर 2004 पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.
2019 मध्ये उमेदवारी नाकारली तरीही पक्षाशी एकनिष्ठ
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली होती, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. मात्र, बावनकुळे यांनी पक्षाच्या निर्णयाचा आदर करत भाजपचे उमेदवार टेकचंद सावरकर यांना निवडून आणले. काँग्रेसचे सुरेश यादवराव भोयर यांचा 11 हजार 116 मतांनी पराभव झाला होता. उमेदवारी नकारानंतर बावनकुळे यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली, आणि त्यानंतर ते भाजप प्रदेशाध्यक्ष बनले.
आता भाजपची सावध भूमिका
सद्याच्या परिस्थितीत विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाचा विचार करून सावध पवित्रा घेतला आहे. कामठी मतदारसंघात 2024 मध्ये पुन्हा बावनकुळे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार राजू पारवे कामठीत 17 हजार मतांनी पिछाडीवर होते, ज्यामुळे विद्यमान आमदार सावरकर यांच्या विरोधात पक्षामध्ये नाराजी आहे.
काँग्रेसची तयारी आणि जातीय समीकरण
काँग्रेसकडून कामठी विधानसभा मतदारसंघासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, प्रा. अवंतिका लेकुरवाळे, जयंत दळवी आणि राजेश काकडे हे इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये कुणबी समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. कामठी मतदारसंघातील जातीय समीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या मतदारसंघात कुणबी मतदार जास्त आहेत. बावनकुळे हे कुणबी असल्याने त्यांच्या विरोधात कॉंग्रेसही कुणबी उमेदवार देण्याची शक्यता आहे.
मुख्य लढत भाजपविरुद्ध काँग्रेसमध्येच
कामठीतून बावनकुळे रिंगणात असू शकतात. काँग्रेस, बसपा, वंचित बहुजन आघाडी असे अनेक पक्ष कामठीत सक्रिय असले तरी मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस अशीच थेट लढत दिसते आहे. या थेट लढतीत इतर पक्ष मतांचे विभाजन घडविण्याची तेवढी भूमिका पार पाडू शकतात.
काँग्रेसकडून कोण?
बावनकुळे यांच्या पुनरागमनाने भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिक लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये उमेदवार निवडण्यासाठी नेते सुनील केदार आणि मुकुल वासनिक यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. कामठीच्या राजकीय इतिहासात काँग्रेसने नेहमीच आपली ताकद दाखवली आहे, मात्र भाजपने बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ जिंकून काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेसला त्यांच्या या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला तोंड देण्यासाठी एक मजबूत रणनीती आखावी लागेल.
कामठी मतदारसंघाच्या समस्या
अतिक्रमणाची तसेच अनेक वस्त्यांत घाणीचे साम्राज आहे. कोरडी वीज निर्मिती केंद्रामुळे प्रदूषणावर ओरड होते. मध्य प्रदेशातील धरणामुळे तोतलाडोह जलाशयावर परिणाम झाल्याने काही भागात सिंचनाची समस्या आहे. मतदारसंघात मागील 20 वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाल्याचा बावनकुळे समर्थकांचा दावा आहे. त्यात जलसंधारण, रस्ते, समाज भवन, ग्रीनजीमचे जाळे, प्राथमिक आरोग्य केंद्र व बालवाड्यांच्या इमारती, वॉटर एटीएमचे जाळे, भूमिगत वीज वाहिन्या, नवी वीज उपकेंद्र, कोराडी महालक्ष्मी मंदिर आणि ड्रॅगन पॅलेसचा विकास यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. उद्योग वा अन्य माध्यमातून रोजगारवाढीच्या क्षेत्रात मात्र फारसे काम झालेले नाही.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications