Maharashtra Assembly Election : महायुतीत असूनही भाजपने वेगळी रणनीती कशी तयार केली?
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कर्नाटकात सत्ता त्यांच्या हातातून गेली आहे. तेलंगणातही त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे, अशा स्थितीत महाराष्ट्रासारख्या राज्याची ती कोणत्याही किंमतीत निसटून जाऊ द्यायची नाही हे त्यांचे ध्येय आहे.
नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षाने आतापासूनच विशेष रणनीती राबवण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आतापासूनच राज्यात जास्त वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे.

मतांच्या आकड्यावर उमेदवारीची रणनिती
भाजप हा सत्ताधारी महायुतीचा एक भाग असला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत समन्वयाने निवडणूक लढवणार असला, तरी पक्षानेही विशेष रणनीती तयार केली आहे. महाराष्ट्रात भाजप प्रत्येक जागेसाठी विशेष रणनीती आखत आहे. पक्ष प्रत्येक जागेसाठी मतांच्या आकड्यांच्या गणिताच्या आधारे उमेदवारांची नावे निवडत आहे. निवडणूक प्रचाराला एकसमान धार देता यावी, यासाठी प्रत्येक जागेसाठी केंद्रीय नेते उभे करण्याची विशेष तयारी सुरू आहे.
भाजप फडणवीसांच्या नैतृत्तवातच निवडणूक लढणार
या निवडणुकीतही भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा राहणार आहे. पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणणीस यांना नेतृत्व म्हणून पुढे केले जाईल. विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या संयुक्त नेतृत्वाचा अंदाज लावणार असला तरी, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फडणवीस हा एकमेव चेहरा असेल, असे ईटीने राज्य भाजप नेत्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
फडणवीस बॅनरच्या केंद्रस्थानी
फडणवीस यांना केंद्रस्थानी ठेवून सरकारी योजनांची पोस्टर्सही पक्षाने बनवली आहेत, जेणेकरून राज्यात पुन्हा स्वतःच्या नेतृत्वाखालील सरकार पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल. फडणवीस हे राज्यातील भाजपचा मुख्य चेहरा तर आहेतच, पण पक्षाच्या वतीने ते मित्रपक्षांसोबत जागावाटप आणि विविध जागांवर संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या चर्चेतही आघाडीवर आहेत.
भाजपने भूपेंद्र यादव यांच्या मदतीसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सहनिवडणूक प्रभारी बनवले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाला अनपेक्षित विजय मिळवून देण्यात या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे या दोघांनाही पक्षाने महत्त्वाची जबाबदारी देऊन महाराष्ट्रात पाठवले आहे. महाराष्ट्र निवडणुकीसाठी भाजपच्या रणनीतीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पक्षाने राज्यातील विविध भागात वरिष्ठ नेत्यांना जबाबदारी दिली आहे. जे त्या - त्या निश्चित केलेल्या क्षेत्रातील संपूर्ण निवडणूक प्रचाराची कमान सांभाळतील. पक्षाचे हे सर्व नेते निवडणुकीची रणनीती बनवण्यात माहीर मानले जातात.
निवडणुकीत राजकारणातील 'या' दिग्गजांना जबाबदारी
- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय हे नागपूर क्षेत्राची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
- दुसरे खासदार मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद पटेल यांच्याकडे यवतमाळ वर्ध्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
- भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते खासदार नरोत्तम मिश्रा भंडारा-गोंदिया परिसरावर लक्ष ठेवणार आहेत.
- कर्नाटकचे ज्येष्ठ भाजप नेते सीटी रवी यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही सुरू केले आहे.
- भाजपचे राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- गुजरातचे भाजप आमदार अमित ठकार यांना नाशिक विभागात नियुक्ती देण्यात आली आहे.
- भाजपने अहमदनगर जिल्ह्याचा कार्यभार अनिल जैन यांच्याकडे सोपवला आहे.
-
अदानी समूहाचा मोठा निर्णय: देशात उभारणार 300 शाळा, 30 रुग्णालये; 60 हजार कोटींची गुंतवणूक -
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
weather update : महाराष्ट्राचा पारा 41.8 अंशांवर! आजपासून 'या' ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार!







Click it and Unblock the Notifications