99 पैकी 89 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी; सख्ख्या भावांना तिकीट, वाचा- BJPच्या पहिल्या यादीविषयी
Maharashtra BJP First Candidate List Read Detailed : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांवर मतदान होईल. तर आज रविवारी दि.20 भाजपकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात 99 नावांचा समावेश आहे. त्यापैकी 89 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.
तर या यादीत एकही मुस्लिम उमेदवार नसल्याचे दिसून आले. बहुतांश उमेदवार हे ओबीसी, मराठा, आदिवासी या समाजातील आहेत. जे भाजपचे व्होट बॅक म्हणून ओळखले जातात. तर 99 पैकी 10 नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत, वाचा सविस्तर....!

मुंबईत सख्ख्या भावांना तिकीट
घाटकोपर पश्चिममधून राम कदम यांचा पत्ता कट केला जाईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना पहिल्या यादीमध्ये संधी देण्यात आली आहे. मालाड पश्चिममधून विनोद शेलारयांना संधी देण्यात आली आहे. विनोद शेलार हे आशिष शेलार यांचे बंधू आहेत. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे. तसेच मंगल प्रभात लोढा यांना मलबार हिल मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. अंधेरी पश्चिममधून अमित साटम यांना तिकीट देण्यात आले.
लोकसभेत पराभव, विधानसभेत पुन्हा संधी
4 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि मिहिर कोटेचा यांचा पराभव झाला होता. लोकसभेसाठी मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून आणि मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून रिंगणात होते. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी लढत पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत झाली होती. लोकसभेत पराभव झाला असला तरी या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे.
तीन अपक्षांना मिळाली उमेदवारी
भाजपच्या पहिल्या यादीमध्ये तीन अपक्षांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. यामध्ये महेश बालदी यांचा सुद्धा समावेश आहे, तर अन्य दोन अपेक्षांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. यामध्ये राजेश बकाने यांना देवळी विधानसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे, तर विनोद अग्रवाल यांना गोंदिया मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. हे दोन्ही आमदार मागील वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते.
मुंबईत या उमेदवारांना संधी?
मुलुंड : मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व : अतुल भातखळकर
चारकोप : योगेश सागर
मालाड पश्चिम : विनोद शेलार
गोरेगाव : विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम : अमित साटम
विलेपार्ले : पराग अळवणी
घाटकोपर पश्चिम : राम कदम
वांद्रे पश्चिम : आशिष शेलार
सायन कोळीवाडा : कॅप्टन तमिल सेल्वन
वडाळा : कालिदास कोळंबकर
मलबार हिल : मंगलप्रभात लोढा
कुलाबा : राहुल नार्वेकर
महाराष्ट्रात जाहीर झालेल्या उमेदवारांची संपूर्ण नावं
1. नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
2. कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
3.शहादा - राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा - जयकुमार रावल
शिरपूर - काशीराम पावरा
रावेर - अमोल जावले
भुसावळ - संजय सावकारे
जळगाव शहर - सुरेश भोळे
चाळीसगाव - मंगेश चव्हाण
जामनेर -गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव - आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) - संजय कुटे
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे - प्रताप अडसद
अचलपूर - प्रवीण तायडे
देवली - राजेश बकाने
हिंगणघाट - समीर कुणावार
वर्धा - पंकज भोयर
हिंगना - समीर मेघे
नागपूर दक्षिण - मोहन माते
नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
तिरोरा - विजय रहांगडाले
गोंदिया - विनोद अग्रवाल
अमगांव - संजय पुरम
आर्मोली - कृष्णा गजबे
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
चिमूर - बंटी भांगडिया
वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव - अशोक उडके
यवतमाळ - मदन येरवर
किनवट - भीमराव केरम
भोकर - क्षीजया चव्हाण
नायगाव - राजेश पवार
मुखेड - तुषार राठोड
हिंगोली - तानाजी मुटकुले
जिंतूर - मेघना बोर्डीकर
परतूर - बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
गंगापूर - प्रशांत बंब
बगलान - दिलीप बोरसे
चंदवड - राहुल अहेर
नाशिक पुर्व - राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे
नालासोपारा - राजन नाईक
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले
मुरबाड - किसन कथोरे
कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड
डोंबिवली - रवींद्र चव्हाण
ठाणे - संजय केळकर
ऐरोली - गणेश नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे
दहिसर - मनीषा चौधरी
मुलुंड - मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर
चारकोप - योगेश सागर
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम
विले पार्ले - पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम - राम कदम
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा - कालिदास कोळंबकर
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
कुलाबा - राहुल नार्वेकर
पनवेल - प्रशांत ठाकूर
उरन - महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड - शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले
कोथरुड - चंद्रकांत पाटील
पर्वती - माधुरी मिसाळ
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव - मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड - राम शिंदे
केज - नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा - अभिमन्यू पवार
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण - अतुल भोसले
सातारा - शिवेंद्रराजे भोसले
कणकवली - नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
इचलकरंजी - राहुल आवाडे
मिरज - सुरेश खाडे
सांगली - सुधीर गाडगीळ












Click it and Unblock the Notifications