अजित पवार यांचं बारामतीत मोठं शक्तीप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी दाखल करण्यासाठी आता फक्त शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अजित पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
उमेदवारी दाखल करण्यापुर्वी अजित दादांना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री नाव असलेली पाटी देण्यात आली. पण अजित पवार यांनी या पाटीवर मुख्यमंत्री लिहिलेली अक्षरे हाताने झाकली.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाटीवर अजित आशाताई अनंतराव पवार मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन असा मजकूर असलेली पाटी देण्यात आली. त्यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री हा शब्द हाताने झाकला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना हात काढण्याची विनंती केली. मुख्यमंत्री शब्द झाकू नका असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हणाले की, असं लिहून कुणी मुख्यमंत्री झालं असतं तर आबादी आबादच झालं असतं. मॅजिक फिगर पण महत्त्वाची आहे ना, 145 आकडा महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितले.

अजित पवार आज अर्ज भरणार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी अजित दादाचं घरी औक्षण करण्यात आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजचं दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी बारामती मोठ्या संख्येने कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत.
बारामतीत काका- पुतण्यात होणार लढत
बारामती विधानसभा मतदार संघात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी शरद पवार देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजर राहणार आहेत. युगेंद्र पवार हे कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.












Click it and Unblock the Notifications