Maharashtra Assembly Election 2024: काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात कोण? महायुतीत रस्सीखेच
Maharashtra Assembly Election 2024 Anil Deshmukh vs Ashish Deshmukhs Katol assembly constituency : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख गाड्यांमध्ये सरळ सरळ लढत असणार आहे. अशीच लढत नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदार संघातही असेल. या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अनिल देशमुख किंवा त्यांचे पुत्र सलील देशमुख या दोघांपैकी एक महाविकास आघाडीकडून उमेदवार असणार आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात भाजप आणि अजित पवार गटानेही याच मतदारसंघावर दावा केला आहे.
काटोल मतदारसंघाचे सध्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते स्वत: यावेळी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांच्या पुत्र सलील देशमुख यांनाही ते पुढे करीत आहेत. सलील देशमुख हे जिल्हा परिषद सदस्य असून, युवा नेता म्हणून त्यांना पक्षातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीतून कोण उमेदवार?
महायुतीमध्ये या मतदारसंघावर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही दावा केला आहे. अजून जागा वाटप झालेले नाही. त्यामुळे मतदार संघ कुणाला सुटणार हे बघणे महत्त्वाचे आहे. या मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर आणि अविनाश ठाकरे इच्छुक आहेत. तसेच शिवसेनेकडून किरण पांडव, राजू हरणे यांनीही अनिल देशमुख यांच्या विरोधात लढण्याची तयारी दर्शवली आहे.
अजित पवार गटाचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रा कार्यक्रमांतर्गत अजित पवार गटाने काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे. अजित पवार यांनी या मतदारसंघातील इच्छुकांची चाचपणी केली असून, कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महायुतीमधील जागा वाटपापूर्वीच राष्ट्रवादीतून उमेदवाराचा दावा ठोकला गेल्याने भाजपचे स्थानिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
असा आहे मतदारसंघ
काटोल मतदारसंघ नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल आणि नागपूर (ग्रामीण) तालुक्यांचा समावेश करतो. येथील प्रमुख गावे बंधारा, कवडीमेट, सिरपूर, भुयारी, खैरी, आमगाव, पाचंनवरी आणि मालेगाव यासारखी आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो. या टमतदारसंघात कुणबी आणि आदिवासी मतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे त्यांचा मतदानावर प्रभाव मोठा असतो.
सन 2019 च्या निवडणुकीतील निकाल
सन 2019 च्या निवडणुकीत काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांचा 17 हजार 057 मतांनी पराभव केला होता. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या भागात भक्कम स्थान मिळाले होते. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे.
'या' आहेत समस्या
अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग आणि इतर आरोपांमुळे त्यांनी 2021 मध्ये गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना अटक झाली होती आणि न्यायालयाच्या आदेशाने त्यांना एक वर्ष तुरुंगात ठेवले गेले. त्यामुळे मतदारसंघातील अनेक विकास कामे रखडली. त्यांच्या अनुपस्थितीत सलील देशमुख यांनी मतदारांशी संपर्क साधून कामे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक प्रकल्प पूर्ण होऊ शकली नाहीत. रखडलेली विकास कामे ही येथील प्रमुख समस्या आहे आणि ती या निवडणुकीत प्रमुख चर्चेचा विषय होण्याची शक्यता आहे. रस्ते, पाणी या प्रमुख समस्या आहेत.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!










Click it and Unblock the Notifications