Maharashtra Assembly Election 2024 :हे 11 नेते पकडतील शरद पवारांचा हात; महायुतीला धक्क्यामागून धक्के
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी राबवविलेल्या माढा पॅटर्नची जोरदार चर्चा झाली. भाजपच्या धैर्यशिल मोहिते पाटलांना फोडून शरद पवारांनी त्यांना लोकसभेला निवडून आणले. हाच माढा पॅटर्न आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही चर्चेत आलाय.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये समरजीत घाटगेंना फोडून या पॅटर्नचा श्रीगणेशा केला. त्यानंतर इंदापूरात हर्षवर्धन पाटलांनाही आपल्याकडे ओढले. आता अजूनही 11 उमेदवार अजित पवार व भाजपला सोडून शरद पवारांकडे येण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार त्यांना उमेदवारी देतील, अशाही चर्चा आहेत.

कागलमधून केली होती माढा पॅटर्नची सुरुवात
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी सोलापूरच्या मोहिते पाटलांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या रणजितसिंह मोहिते पाटलांचा पराभव केला. शरद पवारांचा हा माढा पॅटर्न त्यानंतर राज्यात प्रसिद्ध झाला. शरद पवारांची क्रेझ पाहता अजित पवारांसोबत गेलेल्या अनेक नेत्यांनाही परतीचे वेध लागले. कागलमध्ये समरजीत घाटगेंनी सर्वप्रथम हाती तुतारी घेण्याचं निश्चित केल्यानंतर इंदापूरमध्येही हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर रामराजे निंबाळकरांचाही मुहूर्त ठरला असल्याची खात्रीलायक बातमी आहे.
राजेंद्र शिंगणेही साथ सोडणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिगणे हे काल सुप्रिया सुळेंच्या गाडीत दिसल्याच्या चर्चा आहेत. काल मोदीबागेतून सुप्रिया सुळेंची गाडी बाहेर निघाली त्यावेळी शिंगणे त्या गाडीत होते व पत्रकारांना पाहिल्यावर त्यांनी चेहरा झाकला अशाही चर्चा होत्या. ते लवकरच अजितदादांची साथ सोडतील असं समजतंय. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभेचे आमदार आहेत. त्याचसोबत येत्या 14 ऑक्टोबर रोजी फलटणचे रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या गटात परतणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आऊटगोईंग आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू असल्याचं चित्र आहे.
या नऊ नेत्यांचीही पवारांसोबत येण्याची चर्चा
मदन भोसले (वाई), विवेक कोल्हे (कोपरगाव), बाळा भेंगडे (मावळ), बापू पठारे (वडगाव शेरी), प्रशांत परिचारक (पंढरपूर-मंगळवेढा), राजन पाटील (मोहोळ), बबन शिंदे (माढा), दिलीप सोपल (बार्शी),
रमेश कदम (मोहोळ) हे नेतेही लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील, अशा चर्चा वाढल्या आहेत. हे सर्व पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा हा माढा पॅटर्न यशस्वी होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications