महाराष्ट्र, झारखंडसह 14 राज्यातील पोटनिवडणुकांची घोषणा; EC प्रेसमधील माहिती वाचा 10 मुद्द्यांमध्ये!
Election Commission Press Details : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तसेच याप्रसंगी झारखंड विधानसभा निवडणुकांसह 14 राज्यातील 48 विधानसभा आणि 2 लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. चला तर जाणून घेऊया, निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज काही काय घोषणा केल्यात....! त्यांच्या प्रेसमधील माहिती आपण 10 मुद्द्यांमध्ये जाणून घेऊया...!
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान...!
झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 13
नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबरला, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया अशी असेल...!
23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
30 ऑक्टोबर उमेदवार अर्जाची छाननी
4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार
20 नोव्हेंबरला राज्यात मतदान
23 नोव्हेंबरला मतमोजणी
महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार...!
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्ड होणार आहे.
ज्येष्ठांसाठी ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे. त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागेल, असे राजीव कुमार म्हणाले.

मतदारांसाठी सुविधा पोर्टल ॲप
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, मुंबईत गेल्यावेळी काही तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आम्ही आता लोकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी सुविधा पोर्टल नावाने ॲप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असेही ते म्हणाले.
एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल.
14 राज्यातील 48 विधानसभेसाठी पोटनिवडणूक
निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र-झारखंडसह 14 राज्यांतील 48 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या जागांसाठीच्या पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या. 13 नोव्हेंबर रोजी केरळमधील वायनाड लोकसभा जागेसह 12 राज्यांतील 47 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघासह केदारनाथ मतदारसंघावर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
या राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका..
विधानसभेच्या 48 पैकी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 9जागा आहेत. मिल्कीपूर जागेवर पोटनिवडणूक होणार नाही. राजस्थान (7), पश्चिम बंगाल (6), आसाम (5), बिहार (4), पंजाब (4), कर्नाटक (3), केरळ (2), मध्य प्रदेश (2), सिक्कीम (2), गुजरात (1) ) ), उत्तराखंड (1), मेघालय (1) आणि छत्तीसगडमध्ये 1 विधानसभेची जागा आहे.
जागा का रिक्त झाल्या : 42 जण खासदार झाले, तिघांचे निधन
विधानसभेच्या 48 पैकी 42 जागांचे आमदार खासदार झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 11 आमदार काँग्रेसचे, 9 भाजपचे, SP-TMCचे प्रत्येकी 5 आणि इतर पक्षांचे 12 आमदार आहेत. उर्वरित सहा जागांपैकी तीन जागा मृत्यूमुळे रिक्त झाल्या आहेत. सपा आमदार तुरुंगात गेल्याने, सिक्कीममधील दोन आमदारांचे राजीनामे आणि मध्य प्रदेशात एका आमदाराने पक्ष बदलल्यामुळे ही जागा रिकामी झाली. केरळमधील वायनाडची जागा राहुल गांधींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली असून महाराष्ट्रातील नांदेडची जागा काँग्रेसच्या खासदाराच्या निधनामुळे रिकामी झाली आहे.
महाराष्ट्र मतदार किती, मतदारसंघ किती? अन् मतदार किती
- 288 जागांसाठी किती मतदार असतील?
- एकूण मतदार - 9 कोटी 63 लाख
- नव मतदार - 20.93 लाख
- पुरूष मतदार - 4.97 कोटी
- महिला मतदार - 4.66 कोटी
- युवा मतदार - 1.85 कोटी
- तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
- 85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
- शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
- दिव्यांग मतदार - 6.32 लाख.
झारखंडमध्ये पहिल्यांदाच 11.84 लाख मतदार
झारखंडमध्ये 24 जिल्हे आणि 81 विधानसभेच्या जागा आहेत. 5 जानेवारी 2025 रोजी मुदत संपत आहे. 2.6 कोटी मतदार आहेत. प्रथमच मतदारांची संख्या 11.84 लाख आहे. 1 लाख 186 मतदान केंद्रे आहेत. यावेळी देखील आम्ही PWD आणि महिला व्यवस्थापित बूथ बनवू. 1.14 लाख मतदार 85 पेक्षा जास्त वयाचे आहेत., असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

EC ने EVM वर तथ्यावर बोलले...
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, 'लोक विचारतात की काही देशांमध्ये पेजरने फोडले तर ईव्हीएम हॅक का होऊ शकत नाहीत? पेजर जोडलेले आहे भाऊ, ईव्हीएम नाही. ईव्हीएम तपासणी 6 महिन्यापूर्वीच सुरू होते. मतदानाला या, मतदानानंतर परत या. प्रत्येक मंचावर राजकीय पक्षांचे एजंट किंवा उमेदवार उपस्थित असतात. बॅटरी कमिशनिंगच्या दिवशी घातली जाते. त्यामुळे ईव्हीएम अजिबात हॅक होऊ शकत नाही.
राजीव कुमार म्हणाले की, मतदानाच्या पाच ते सहा दिवस आधी कमिशनिंग होते. या दिवशी चिन्हे घालतात आणि बॅटरी घालतात. एजंटची सहीही बॅटरीवर लावली जाते. स्ट्राँग रूममध्ये जातो, इथेही 3 लेव्हल चेकिंग आहे. ज्या दिवशी तुम्ही मतदानासाठी बाहेर पडाल त्या दिवशी हीच प्रक्रिया होईल. व्हिडिओग्राफी होईल. क्रमांकही शेअर केले जातील, हे मशीन इथल्या बूथवर जाईल. त्यानंतर तपासणी होईल, मतदान होईल आणि पाहिले जाईल. दिवसभर मतदान झाले. मग मशीन लॉक होते. त्यानंतर स्वाक्षरी आणि लेखाजोखा होतो. 20 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही प्रत्येक प्रश्नाची तथ्यात्मक उत्तरे देऊ. लवकरच देणार. पुढेही काहीतरी येईल, ते थांबणार नाही. पण आम्ही त्याला उत्तर देत राहू, असेही निवडणूक आय़ुक्त राजीव कुमार म्हणाले.
जम्मू आणि काश्मीरच्या लोकांचे केले अभिनंदन
निवडणूक आयोगाच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. ही निवडणूक यशस्वी पूर्ण करण्यासाठी राजीव कुमार यांनी तेथील मतदारांचे आभार मानत अभिनंदन केले. 'जम्मू-कश्मीर की आवाम ने जम्हूरियत के जश्न को ऐतिहासिक बना दिया है।' असे म्हणत आयुक्तांनी या निवडणूक प्रक्रियेचे वर्णन केले. तर कोणत्याही प्रकारची हिंसा या ठिकाणी झाली नाही. अतियश शांततेत ही निवडणूक झाल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.












Click it and Unblock the Notifications