राज्यात मोठे प्रशासकीय बदल ! कुंभमेळा आयुक्त बदलले, 'या' जिल्ह्याधिकाऱ्यांच्याही बदल्या
राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रोहन घुघे
या बदल्यांनुसार, जळगाव जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आयुष प्रसाद यांची आता नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावची कमान आता रोहन घुघे यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. घुघे हे यापूर्वी जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
नाशिक आणि रत्नागिरीतही मोठे बदल
नाशिकमध्येही मोठ्या नियुक्त्या झाल्या आहेत. नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नियुक्ती नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (Nashik Metropolitan Region Development Authority) येथे Metropolitan Commissioner म्हणून झाली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी असलेले देवेन्द्र सिंग यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबईचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
इतर महत्त्वाच्या नियुक्त्या
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांची नियुक्ती नाशिक कुंभमेळा कमिशनर म्हणून करण्यात आली आहे.
- मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची साखर आयुक्त, पुणे या रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे.
- या बदल्यांमुळे प्रशासकीय यंत्रणेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications