मुंबईच्या मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी : फक्त 'हाय' मॅसेज करुन बुक होईल तिकीट; कसे? वाचा
महा मुंबई मेट्रोने एक नवीन व्हॉट्सअॅप तिकीट प्रणाली सुरू करण्याची घोषणा मंगळवारी केली. मुंबई मेट्रोने मंगळवारी एक्सवर याबाबत माहिती दिली. त्यात प्रवाशांना फक्त एका साधा "हाय" मॅसेज केल्याने तिकिटे खरेदी करता येणार आहे. महामुंबई मेट्रोच्या या घोषणेमुळे प्रवाशांच्या रांगा आणि तिकिट काढण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे. महामुंबईच्या या नव्या संकल्पनेमुळे मेट्रोचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक होईल, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे पोस्टमध्ये?
अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आता त्या लांब रांगा, ना कागदी तिकिटे... फक्त एक व्हाट्सएप संदेश आणि व्हा प्रवासाला सज्ज! फक्त या 86526-35500 नंबरवर "हाय" मॅसेज पाठवा. आणि तिकिटासाठी प्रतीक्षा न करता त्वरी प्रवासाला बसवा." या पोस्टचा अर्थ असा आहे की, प्रवाशांना आता महामेट्रोचे तिकीट काढण्यासाठी रांगा लावाव्या लागणार नाहीत. फक्त एक व्हॉट्सअॅप संदेश पाठविल्यावर म्हणजेच 86526-35500 वर "हाय" पाठल्यावर तुम्हाला तिकीट मिळणार आहे.
तिकिटे कसे बुक करायचे?
- व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह करा:
- ८६५२६-३५५०० हा नंबर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करा.
- 'हाय' पाठवा:
- व्हॉट्सअॅप उघडा आणि सेव्ह केलेल्या नंबरवर एक साधा "हाय" मेसेज पाठवा.
- तुमचा पर्याय निवडा
- महा मुंबई मेट्रो अनेक पर्यायांसह उत्तर देईल
- तिकीट खरेदी करा
- तिकीट मिळवा
- शेवटचा व्यवहार
- 'तिकीट खरेदी करा' निवडा
- पुढे जाण्यासाठी "तिकीट खरेदी करा" पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला "येथे क्लिक करा" असा संदेश असलेली एक लिंक मिळेल.
- तुमचे बोर्डिंग आणि डेस्टिनेशन स्टेशन निवडा.
- तुमचे स्टेशन निवडल्यानंतर, तुमची तिकीट खरेदी अंतिम करण्यासाठी "सुरू ठेवा" वर क्लिक करा.
-पेमेंट पद्धतीबद्दल:
-तपासा आणि पुष्टी करा, तुमच्या तिकिटाच्या तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि पेमेंट पद्धत निवडा.
-"पुनरावलोकन करा आणि पैसे द्या" वर क्लिक करा आणि UPI, कार्ड, वॉलेट द्वारे सुरक्षितपणे पैसे द्या- तुमचा पसंतीचा मोड निवडा आणि पुढे जा.
- तुमचे QR तिकीट त्वरित मिळवा आणि कोणत्याही अडचणीशिवाय तिकीट मिळवा; फक्त स्कॅन करा आणि राइड करा.












Click it and Unblock the Notifications