अकरावीसाठी महाविद्यालयात उद्यापासून प्रवेश प्रक्रिया, शेवटची तारीख काय? जाणून घ्या A टू Z माहिती
Maha fyjc admissions 2025 : राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी २८ जून रोजी सायंकाळी प्रसिद्ध झाली आहे. या पहिल्याच कॅप राउंडमध्ये एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झाले आहेत. यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवारी ३० जून रोजी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. कोटांतर्गत ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश निश्चित केला आहे.

दुसरी फेरीतील जागा कधी दिसतील?
अकरावी प्रवेशाची दुसऱ्या फेरीसाठी ९ जुलै रोजी रिक्त जागा दिसणार आहेत. मंडळाच्या वेबसाईटवर सविस्तर माहितीही देण्यात येईल. या फेरीत एकूण १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.
विज्ञान शाखा
६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते. त्यातील ३ लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
वाणिज्य शाखा
वाणिज्य शाखेसाठी २ लाख २४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे.
कला शाखा
या फेरीत एकूण २ लाख ३१ हजार ३५६ अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख ४९ हजार ७९१ विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालय निश्चित करता येणार आहे.
कुठे पाहाल गुणवत्ता यादी, समस्या निवारणासाठी हेल्पलाईन
अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी https://mahafyjcadmissions.in या लिंकवर जाऊन गुणवत्ता यादी पाहता येणार आहे. त्यात काही अडचणी आल्यास ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत प्रवेशाची मुदत
विद्यार्थ्यांना दि. ३० जून ते ०७ जुलै २०२५ दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. तर दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा ९ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सोमवारपासून प्रवेश घ्यायला सुरुवात होणार
अकरावी प्रवेशप्रक्रिया यंदा ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने राबविली आहे. यात काही तांत्रिक अडचणी आल्याने वारंवार वेळापत्रकात बदल करावा लागला होता. त्यानंतर कालच गुणवत्ता यादी जाहीर झाली असून आता सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया घेता येणार ही मुदत ७ जुलैपर्यंत राहील.












Click it and Unblock the Notifications