Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दीपक टिळक यांचे निधन! लोकमान्य टिळकांशी काय होते नाते? कुलगुरू ते केसरीचे संपादक, वाचा जीवनप्रवास

Lokmanya Tilak's grandson Deepak Tilak passes away : कुलगुरू ते केसरीचे विश्वस्त- संपादकपद भुषवणारे डाॅ. दीपक जयंत टिळक यांचे आज १६ जुलै २०२५ रोजी पहाटे पुण्यात निधन झाले. वृद्धापकाळाने त्यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.

डाॅ. दीपक टिळक यांनी शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात कुटुंबाचा वारसा पुढे नेला आणि जपला. त्यांच्या पश्चात काँग्रेस नेते रोहीत टिळक, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. आज १६ जुलै रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Lokmanya Tilak s grandson Deepak Tilak passes away

कोण होते दीपक टिळक, लोकमान्य टिळकांशी नाते काय?

  • डॉ. दीपक जयंत टिळक हे टिळक विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि केसरीचे विश्वस्त संपादक होते. त्यांनी व्यवस्थापन विषयात पीएच.डी. पुणे विद्यापीठातून पुर्ण केली.
  • भारतीय स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ते पणतू होते. गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे जयंतराव टिळक यांचे ते पुत्र होते.
  • प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि सेवा सदन आणि हुजूर पागा सारख्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या मार्गदर्शक
  • इंदुताई टिळक यांचे ते पुत्र होते. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे बालपणापासूनच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना रस निर्माण झाला होता.

अभ्यास व्यवस्थापन, पत्रकारिता हे प्रमुख क्षेत्र

केसरीचे संपादक पद त्यांनी भुषवले यासह विशेषज्ञता पत्रकारिता पीएच.डी. संशोधन प्रबंध, "वृत्तपत्रांमधील समस्या" मराठी वृत्तपत्रांच्या विशेष संदर्भात व्यवस्थापनात त्यांचे कार्य आहे.

पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रात योगदान

व्यवसाय महाव्यवस्थापक,संपादक , संपादक दैनिक केसरी, पुणे, सह्याद्री- पुणे, कुलगुरू टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (१९९६ ते २००४), शैक्षणिक संस्थांचे सदस्यत्व, माजी सदस्य, गव्हर्निंग कौन्सिल असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, नवी दिल्ली (ऑक्टोबर २०१० - २०१२)

सामाजिक संस्थांशी संबंध

केसरी महाराष्ट्र ट्रस्ट हे १८८१ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेले दैनिक केसरी चालवते. केसरीचे मुख्य विश्वस्त आणि टिळक स्मारक ट्रस्टचे ते विश्वस्त होते.

दीपक टिळक यांचे सुपूत्र रोहीत टिळक हे काँग्रेस नेते असून त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये पुण्यातून दोनवेळा निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

केसरी'चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, 'केसरी'सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+