महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी; वाचा- कोणत्या पक्षातील किती आमदार
First Time Mla List In Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी समोर आली आहे. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर हे आमदार आज आणि उद्या आमदारकीची शपथ घेणार आहे. राज्यात पहिल्याच प्रयत्नात 78 आमदारांचा विजय झालेला आहे. हे सर्व आमदार विविध पक्षाचे आहेत.
राज्याच्या विधानसभेत तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे सर्वात तरुण आमदार आहेत. त्यामुळे 288 सदस्यांमध्ये 27 टक्के पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करत असलेल्या आमदारांचा समावेश आहे.

15 व्या महाराष्ट्र विधानसभेत 25-45 वयोगटातील केवळ 57 आमदार आहेत. चला तर जाणून घेऊया, कोणत्या पक्षाचे किती आमदार पहिल्यांदाच आज आमदारकीची शपथ घेणार आहेत.
भाजपचे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार
शंकर जगताप - चिंचवड
राजन नाईक - नालासोपारा
राघवेंद्र पाटील - धुळे ग्रामीण
संजय उपाध्याय - बोरिवली
अतुल बाबा भोसले - कराड दक्षिण
अनुराधा चव्हाण - फुलंब्री
मनोज घोरपडे - कराड उत्तर
श्रीजया चव्हाण - भोकर
राहुल आवाडे - इचलकरंजी
श्याम खोडे - वाशिम
मिलिंद नरोटे - गडचिरोली
अनुप अग्रवाल - धुळे शहर
हरीशचंद्र भोये - विक्रमगड
अमोल जावळे - रावेर
देवेंद्र कोथे- सोलापूर शहर मध्य
किसन वानखडे - उमरखेड
चरणसिंह बाबुलालजी ठाकूर - काटोल
सुमित वानखेडे - आर्वी
विक्रम पाचपुते - श्रीगोंदा
उमेश यावलकर - मोर्शी
राजेश वानखेडे - तिवसा
राजेश बकाने - देवळी
हेमंत रासने - कसबा पेठ
सई डहाके - कारंजा
सुलभा गायकवाड- कल्याण पूर्व
प्रवीण तायडे - अचलपूर
स्नेहा दुबे पंडीत - वसई
देवराव विठोबा भोंगळे - राजुरा
करण देवतळे - वरोरा
शिवसेना ठाकरे गट
वरुण सरदेसाई - वांद्रे पूर्व
महेश सावंत -माहीम
मनोज जामसूतकर -भायखळा
हारून खान - वर्सोवा
अनंत बाळा नर - जोगेश्वरी
सिद्धार्थ खरात -मेहेकर
गजानन लवटे -दर्यापूर
संजय देरकर -वणी
प्रवीण स्वामी -उमरगा
बालाजी काळे -खेड
शरद पवार राष्ट्रवादी
उत्तमराव जानकर- माळशिरस
रोहित पाटील- तासगाव कवठे महांकाळ
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
अभिजित पाटील- माढा
नारायण पाटील- करमाळा
राजू खरे- मोहोळ
अजित पवार राष्ट्रवादी
सिंदखेडराजा- मनोज कायंदे
अणुशक्तीनगर - सना मलिक
शिरूर - माउली कटके
भोर - शंकर मांडेकर
पारनेर - काशिनाथ दाते
गेवराई - विजयसिंह पंडित
फलटण - सचिन पाटिल
पाथरी- राजेश विटेकर
रोहित पाटील सर्वात तरुण आमदार
- शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटील महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत. त्यांची मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 15व्या महाराष्ट्र विधानसभेत 25-45 वयोगटातील केवळ 57 आमदार आहेत.
- 1970 नंतर प्रथमच ही संख्या खाली आली आहे. मुंबईमधील 36 पैकी 9 आमदारांनी पहिल्याच प्रयत्नात विजय खेचून आणला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचा समावेश आहे, ज्यांनी मनसेचे अमित ठाकरे आणि माहीमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचा पराभव केला.
- वांद्रे पूर्वमध्ये राष्ट्रवादीचे झीशान सिद्दीकी यांचा पराभव करणारे वरुण सरदेसाई यांचाही या यादीत समावेश आहे. मनोज जामसुतकर (भायखळा), अनंत नर (जोगेश्वरी पूर्व) आणि हारून खान (वर्सोवा) हे सुद्धा पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
- बोरिवलीतून विजयी झालेले भाजपचे संजय उपाध्याय, अंधेरी पूर्व मतदारसंघातून मुरजी पटेल, अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादीच्या सना मलिक, धारावीतून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड प्रथमच आमदार झाले आहेत.
- भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकरमधून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत.
- राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रम हे भाजपच्या तिकीटावर श्रीगोंदा येथून विजयी झाले आहेत. त्यांचाही हा पहिला विजय आहे.
- कराड दक्षिणमध्ये भाजपचे अतुल भोसले सुद्धा पहिल्यांदा आमदार झाले असून त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. अतुल भोसले काँग्रेस नेते दिलीप देशमुख यांचे जावई आहेत.
- आर्वी मतदारसंघातून विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
- खानापूरमधून विजयी झालेले शिवसेनेचे माजी आमदार अनिल बाबर यांचा मुलगा सुहास, पैठणमधून खासदार संदिपान भुमरे यांचा मुलगा विलास, एरंडोलमधून विजयी झालेले माजी आमदार चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल यांचाही या यादीत समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications