थर्टी फस्टला लागला ब्रेक..! फक्त 'एवढी'च मिळणार दारु; सरकारचा मोजून-मापून निर्णय
नव्या वर्षाच्या आगमनाला फक्त पाच दिवस शिल्लक आहेत. म्हणजेच तळीरामांच्या आवडत्या थर्टी फस्टला फक्त चार दिवस राहिलेत. त्यातच आता शासनाने नवी गाईडलाईन जाहीर केल्यामुळे हाँटेल सेलिब्रेशनचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कोणत्याही हाँटेल किंवा बारमध्ये गेलात तरी, एका व्यक्तीला आता मोजून-मापूनच दारु विकत घेता येणार आहे.

हाँटेल असोशिएशनचा निर्णय
नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी थर्टी फस्ट साजरा करायचा व त्याच धुंदीत काहीतरी संकल्प करायचा, हे फॅड गेल्या काही वर्षांपासून सर्रास दिसू लागलंय. त्यामुळे अनेकजण हाँटेल किंवा बारमध्ये थर्टी फस्ट साजरा करण्याचं नियोजन अगदी महिना दोन महिने अगोदरच करुन ठेवतात. मात्र यावेळी हाँटेल असोशिएशनने घेतलेल्या निर्णयामुळे या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हाँटेल असोशिएशनने एका व्यक्तीला फक्त चार पॅक दारु विकण्याचाच निर्णय घेतला आहे.
मिळणार फक्त चार पॅक
नव्या नियमांनुसार, नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे हॉटेल किंवा बारमध्ये जाणार आहेत, अशा मद्यपींना केवळ चार पॅक एवढीच दारू मिळणार आहे. चार पॅकपेक्षा अधिक दारू कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही. याबाबत हॉटेल असोसिएशनकडून माहिती देण्यात आली. सेलीब्रेशनच्या नावाखाली प्रमाणाबाहेर दारू पितात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अपघाताचा धोका वाढतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, या वर्षी नव वर्षाच्या स्वागताला हा नियम बनवण्यात आल्याचे, हॉटेल असोसिएशनकडून सांगण्यात आले.
सरकारच्या गाईडलाईन
सरकारकडून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल आणि बारसाठी नवी गाईडलाईन्स प्रसिद्ध करण्यात आली आहे.
१. कोणत्याही ग्राहकाला दारू देण्यापूर्वी त्याच्या वयाबाबत खात्री करून घ्यावी.
२. वयाचा पुरावा असेल तरच दारु विक्री करावी.
३. अल्पवयीन असेल तर दारू विक्री करु नये.
४. दारू पिल्यामुळे जर कुणी घरी जाण्यास असमर्थ असेल, तर अशा व्यक्तींसाठी चालकाची सोय करावी.
५. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सकाळी पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल आणि बार सुरू राहतील.
६. प्रत्येक ग्राहकासाठी दारू विक्रीच्या लिमीटचे बंधन पाळले जावे.












Click it and Unblock the Notifications