Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लक्ष्मण हाकेंची हालत भटक्या कुत्र्यासारखी करु; त्याची चड्डी पिवळी करणार?, NCP नेत्याने दिला इशारा!

Laxman Hake Latest News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे. लक्ष्मण हाकेंची चड्डी पिवळी करण्याची जबाबदारी आमची आहे, त्याची हालत भटक्या कुत्र्यासारखी करू, असा इशाराही एनसीपीच्या नेत्याने दिला.

काय म्हणाले एनसीपीचे चव्हाण?

दोन समाजात तेढ निर्माण व्हावी, म्हणून जाणीवपूर्वक लक्ष्मण हाके स्टंटबाजी करत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नाही, पुढील आठ दिवसांत त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिलाय. लक्ष्मण हाकेंची हालत भटक्या कुत्र्यासारखी करु असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.

Laxman Hake vs Ajit Pawar controversy

दादांवर बोलण्याची लक्ष्मण हाकेंची लायकी नाही

लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर चुकीच्या शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा सुरज चव्हाण यांनी समाचार घेतला. लक्ष्मण हाके जाणीपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांच्यावर बोलण्याची लक्ष्मण हाके यांची लायकी नाही.

तुम्हाला योग्य जागा दाखवण्याची आमची जबाबदारी आमची आहे. लक्ष्मण हाकेंना माझं खुलं आव्हान आहे की, पुढच्या 10 दिवसात त्यांनी महाराष्ट्रात खुलं फिरुन दाखवावं असे सुरज चव्हाण म्हणाले.

हाकेला जशाच तसं उत्तर देऊ. भटक्या कुत्र्याचा कसा उपचार करायचा याची माहिती आम्हाला आहे. प्रसिद्धीसाठी बोलणाऱ्या भटक्यांना त्यांची जागा दाखवली जाईल असेही सुरज चव्हाण म्हणाले.

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके?

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यांनी वापरलेले शब्द कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लक्ष्मण हाके यांच्या कृतीवर प्रतिक्रिया दिली जाऊ शकते. लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अजित पवारांनी ओबीसींवर अन्याय केलाय!

अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री देखील आहेत. अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, असा लक्ष्मण हाके यांचा आरोप आहे. याउलट मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि सारथी संस्थेला पैसे दिले जातात. पण महाज्योती संस्थेला पैसे दिले जात नाहीत. तसेच ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, असा आरोप लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांचा आहे.

गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन!

लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या समर्थक आणि काही विद्यार्थ्यांसह गिरगाव चौपाटी परिसरात जलसमाधी आंदोलन केलं. लक्ष्मण हाके भर समुद्रात खोलवर गेले. तिथे त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+