आरक्षण खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, लक्ष्मण हाके यांची आक्रमक भूमिका
जालना : सरकारी नोंदी मुस्लीम समाजाच्याही निघाल्या आहेत. जर मुस्लीमांच्या कुणबी नोंदी निघाल्या आहेत. तर मुस्लिमांनाही ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवं, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगेंनी घेतली.त्यानंतर ओबीसींच्या हक्कासाठी लढा देणारे लक्ष्मण हाकेही चांगलेच उत्तर दिले आहे.

आरक्षण खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही, असं हाके यांनी म्हटलं आहे. जालना या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
सरकार जरांगे यांना इंटरटेनमेंट करतंय
"या देशात कायद्याचं राज्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे राज्य आहे. कोणीतरी माणूस उठतो आणि वेठीस धरतो. मला सरकारचा खेद वाटतो. सरकार जरांगे यांना इंटरटेनमेंट करतंय. ओबीसी आरक्षणात अशाच जाती घातल्या, ओबीसी असेच आले, त्यांचे कुठले सर्वेक्षण झालेले नाही, त्यांना खिरापत वाटली, त्यांना काही गरज होती का? या पुढे असली मोघम वक्तव्यं महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्याने करू नये," असं आवाहन ही लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तसेच आरक्षण खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही. आता दहा टक्के दिलेला आरक्षणातील सर्वेक्षण १०० टक्के बोगस आहे, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
मुस्लीम समाजाकडे एक धर्म पाहून पाहिलं जातं.त्यांच्याकडे सामाजिक स्तर नाहीत. स्थानिक अधिका-यांना कायद्यात परवानगी दिली आहे. तिथं जाऊन त्यांची परिस्थिती, व्यवसाय पाहून अधिका-यांना योग्य वाटलं तर लगेच त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. तसेच शब्बीर अन्सारी यांनी चळवळीतून अभ्यास करुन शासनकडून जवळपास १०० जीआर त्यांनी करुन घेतले आहेत. ओबीसीच्या हक्कासाठी अधिकारासाठी त्याचं काम खूप मोठं आहे, असे हाके म्हणाले.
मनोज जरांगेंना मंडल आयोग कधी लागू झाला काहीच कळत नाही
मनोज जरांगेंना ओबीसी, मंडल आयोग, मंडल आयोग कधी लागू झाला? आधी किती जाती होत्या? त्यात समावेश करण्यासाठी आणि वगळण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग आहे, अशा राज्य मागासवर्गीय आयोगाने वेळोवेळी अभ्यास केला, त्या आयोगाच्या माध्यामातून या जातीचा समावेश केला जातो. या आयोगाला घटनात्मक दर्जा आहे. कुणी जाती घातल्या,कशा घातल्या हे सगळं बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारल्यासारखे आहे, असा टोला ही लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना हाणला












Click it and Unblock the Notifications