धक्कादायक! 4 वर्षीय चिमुरडीला जन्मदात्या बापानेच दिली फाशी! चाॅकटले मागितल्याने राग-राग, पत्नीशी वाद
Latur Crime News Father kills 4-year-old girl : लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे जन्मदात्या बापानेच 4 वर्षीय चिमुरडीचा गळफास देऊन जीवे मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून बापाने आपल्या पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केला.
ही धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील भीमा तांडा येथे घडली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात 30 वर्षीय बालाजी बाबू राठोड याने त्याची मुलगी 4 आरुषी बालाजी राठोड हिला राहत्या घरी साडीने गळफास दिल्याचे पुढे आले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पती-पत्नीच्या भांडणाचा वाद मुलीच्या जीवावर बेतला!
सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संशयित आरोपी बालाजी राठोड याचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते.यानंतर त्याची पत्नी बायको माहेरी गेली होती.त्यानंतर बालाजी आपली चार वर्षीय मुलगी आरुषीसोबत राहत होता. काल मुलीने चॉकलेट मागितल्यामुळे त्याने रागाच्या भरात पोटच्याच मुलीला गळफास देऊन जीवे ठार केले.
संशयिताला अटक
याप्रकरणी मयत मुलीची आई वर्षा राठोड यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांनी आरोपी बालाजी राठोड याला अटक केली आहे. दरम्यान,या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.या घटनेनंतर घटनास्थळाचा पंचनामा ते इतर कायदेशीर आणि गुन्हेविषयक प्रक्रीया पोलिसांकडून पार पाडली जात आहे.
परिसरात हळहळ
वडिलाने आपल्याच पोटच्या मुलीचा निर्घुन पद्धतीने खून केल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.आपला पती आणि संशयित आरोपी बालाजी राठोड याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पत्नी वर्षा राठोड यांनी केली आहे. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात खळबळ व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications