Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Latur Accident News :काळ आला अन् एका क्षणात सारं संपलं! टेम्पोच्या धडकेत कारमधील 4 महिला ठार, 3 जखमी

Latur Accident News : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ कार आणि ट्रकचा अपघात झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात चार महिला ठार झाल्या आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात एवढा भीषण होता की चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.

कार आणि टेम्पोत झालेल्या भीषण अपघातात जखमी तीन जणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातील कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून या अपघातप्रकरणी चौकशी सुरु आहे.

Latur Accident News

मृत चौघी होत्या एकमेकांच्या नातेवाईक

प्राप्त माहितीनुसार, उदगीरहून कारमधून महिला एकुरगाकडे जात होत्या. तालुक्यातील एकुरकाजवळ आज (ता. 7) नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मारुती स्विफ्ट डिझायर कारला टेम्पोने समोरून जोरदार धडक दिली.

कार एकुरगा गावाजवळ येताच समोरून आलेल्या भरधाव आयशर टेम्पोने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात कारचा चुराडा झाला तर अपघातात चार महिला जागीच ठार झाल्या. या चौघीही एकमेकींच्या नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

मंगलबाई गोविंद जाधव (वय 55 रा. एकुरका), प्रतिभा संजय भंडे (वय 30 रा. दावणगाव), प्रणिता पांडुरंग बिरादार (वय 25 रा. होणाळी), अन्यना रणजित भंडे (वय 14, रा. दावणगाव) अशी मृत महिलांची नावे आहेत. या चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन जखमीना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उदगीर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

गावात शोककळा

अपघातातील चौघीजणी एकाच गावात जात होते. या चौघींचाही मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या महिला एकमेकांच्या नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी उदगीर पोलिसांत नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+