लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा! आजपासून इतके दिवस खात्यात पैसे येणार; पुढचा हप्ता कधी? वाचा अपडेट
Ladki Bahin Yojana update : महाराष्ट्रातील कोट्यवधी माता-भगिनींसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी! 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा' सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते तपासा आणि खात्यात पैसे आले की नाही हेही तुम्हाला लगेच समजू शकेल.
महिला सक्षमीकरणाची ही क्रांती अखंड विश्वासाने सुरू असून, लवकरच योजनेतील सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे. स्वतः अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

लक्षात ठेवा! ही मदत अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आणि पुढील निधी वेळेवर जमा होण्यासाठी, सर्व लाभार्थी भगिनींना एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. (https://ladakibahin.maharashtra.gov.in) या लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केलेली E-KYC प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण करावी, असे आवाहन राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. सांगायचे झाल्यास ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पुढील लाभ मिळणार नाही.
पुढचा हप्ता कधी मिळणार, कुणाला मिळणार...
लाडकी बहिण योजनेचा या महिन्याचा म्हणजेच ऑक्टोबर २०२५ चा हप्ता नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठ ते दहा तारखेपर्यंत हा हप्ता लाडक्या बहिणींना मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांनाच हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींनो खात्यात पैसे आले की नाही? 'या' 4 सोप्या स्टेप्सद्वारे तपासा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 9, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित… pic.twitter.com/6e3CgboGVL
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची खास वैशिष्ट्ये
- लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० (पंधराशे रुपये) इतका सन्मान निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतो.
- या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील माता-भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हा आहे.
- निधीचे वितरण थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात (DBT) केले जाते, ज्यामुळे व्यवहारात पूर्ण पारदर्शकता राहते.
..तर लाभ बंद आधी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया करा!
पुढील महिन्यांपासून लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी, योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी (E-KYC) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळेल.
लाडकी बहिण योजनेचे स्वरूप
योजनेला 'महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती' असे संबोधले जाते, जे या योजनेचे सामाजिक महत्त्व आणि व्यापक स्वरूप दर्शवते. खुद्द मंत्र्यांनी (अदिती तटकरे) सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी वितरणाच्या प्रक्रियेची माहिती देऊन, लाभार्थ्यांमध्ये विश्वास आणि उत्साह कायम ठेवला आहे.












Click it and Unblock the Notifications