Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; अजित पवारांनंतर आता एकनाथ शिंदेंनीही सांगितले 2100 कधी मिळणार..?

महायुती सरकारसाठी महत्त्वाची ठरलेल्या लाडकी बहिण योजनेची चर्चा कायम होताना दिसते. याच लाडकी बहिण योजनेने महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणले. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली. मात्र महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेचे मानधन १५०० हजारांवरुन २१०० रुपये करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या काळात दिले होते. आता हे २१०० रुपये कधी मिळणार याबाबतचं मोठं अपडेट आता समोर आलं आहे.

Ladki Bahin Scheme Update

का वाढलीय चर्चा?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. आता 2100 रुपये कधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्यातही पदरी निराशा आली. त्यामुळे ही योजना सुरु झाल्यापासून या योजनेबाबत रोज काही ना काही चर्चा सुरुच राहत असलेली दिसत आहे.

विरोधकांची होतेय टीका

या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच या योजनेच्या निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला उधाण आलं आहे. मात्र ही योजना सुरूच राहणार असून, पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळत राहील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय आहे महत्त्वाची अपडेट?

या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण नऊ हाप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्याचा हाप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळाला आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्त्वाची माहिती दिली. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, आणि लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रूपये देवू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+