Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेतील या महिलांना मिळणार नाही, जूनचा दीड हजारांचा हप्ता! कारण काय?
Ladki Bahin Yojana These women will not get the June installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जून १२ चा हप्ता अपडेट लाडकी बहिण योजना ही महराष्ट्र सरकारची खूपच लोकप्रिय होत असलेली योजना आहे. या योजनेद्वारे प्रत्येक पात्र आणि लाभार्थी महिलेला दीड हजार रुपये मानधन दिले जाते. आता लवकरच जून महिन्याचा हप्ता सरकार वितरीत करण्यास सुरुवात करणार आहे. लाडक्या बहिणींना या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील २.४७ कोटींहून अधिक महिलांसाठी सरकारकडून संकेत दिले गेले की, जून २०२५ चा १,५०० रुपयांचा १२ वा हप्ता दोन ते तीन दिवसांपासून पुढे वितरित केला जाईल. यामुळे आता लाभार्थी लाडक्या बहिणींना या हप्त्याची प्रतिक्षा आहे. हा यंदाचा बारावा हप्ता आहे.
या महिलांना मिळणार नाही जूनचा हप्ता (Ladki Bahin Yojana)
लाडक्या बहिणींना बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा जरी असली तरीही काही महिलांना या महिन्यात दीड हजारांचा हप्ता मिळू शकणार नाही. महाराष्ट्र लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्रता नियमांनुसार, काही महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. कुणा-कुणाला अपात्र घोषित केले गेले.
२१ वर्षांखालील महिला किंवा ज्या महिलांचे ६५ वर्षापेक्षा अधिक वय झाले आहे अशा महिला पात्र ठरणार नाहीत.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेले अर्जदार महिलांना आणि सरकारी कर्मचारी असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळणार नाही या अपात्र ठरवलेल्या आहेत.
ट्रॅक्टर वगळता ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहने आहेत, ज्यांना आधीच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
महाराष्ट्रातील अनिवासी असलेल्या महिला आणि वरील कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत आणि अधिकाऱ्यांनुसार, पडताळणी मोहीम सुरूच राहणार आहे.
१२ वा हप्ता कधी जमा होईल? (Ladki Bahin Yojana)
सरकारने अद्याप अधिकृतपणे बाराव्या हप्त्याची तारीख जाहीर केली नाही तरीही जूनच्या शेवटच्या आठवड्यात थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे.
जूनच्या हप्त्यासाठी ३ हजार ६९० कोटी रुपये लागणार..
प्राप्त माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता वाटण्यासाठी राज्य सरकारकडून महिला आणि बालविकास विभागाला लवकरच ३,६९० कोटी रुपये देण्याची अपेक्षा आहे. ही रक्कम दोन टप्प्यात दिली जाणार आहे. एप्रिल आणि मे महिन्याचा ज्या पात्र लाभार्थी महिलांना हप्ता मिळालेला नाही त्यांना जूनच्या हप्त्यासह तीन हप्ते मिळतील अशी शक्यताही आहे.












Click it and Unblock the Notifications