लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीच मिळणार नाहीत; या मंत्र्यांच्या भूमिकेने नव्या वादाला फुटले तोंड!
Ladki Bahin Yojana Latest News, Sanjay Shirsat : लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये देता येणार नाही, ही वस्तूस्थिती असून ती समजून घेतली पाहिजे, असे परखड मत महायुतीतील मंत्री संजय शिरसाट यांनी मांडले. त्यामुळे महायुती सरकारच्या वतीने निवडणुकीच्या काळात महिलांना दिलेले आश्वासन हे खोटं होतं का, असा सवाल आता केला जात आहे. तर विरोधकांकडून देखील शिरसाटांच्या विधानाचा समाचा घेतला जात आहे.
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांत वाढ करुन 2100 रुपये देण्यात येईल, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती. मात्र, राज्यात महायुती सरकार येऊन पाच-सहा महिने होत आले आहेत. तसेच एक अर्थसंकल्पीय अधिवेशनही पार पडलं. मात्र, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न सद्या तरी अनुत्तरीच आहे.

नरहरी झिरवाळ यांनीही केले वादग्रस्त विधान!
दुसरीकडे सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेवरुन मोठे विधान केले होते. 2100 रुपये देण्याचा शब्द आम्ही कोणीही दिलेलाच नाही, असे म्हणून त्यांनी लाडक्या बहिणींची नाराजी ओडावून घेतली आहे. त्यानंतर आता शिवसेना आमदार तथा महायुती सरकारचे मंत्री संजय शिरसाट यांनीही लाडकी बहीण योजनेवरुन स्पष्ट भूमिका मांडून त्यांनी महिलांना पैसे देणे अवघड असल्याचे स्पष्ट केले.
काय म्हणाले संजय शिरसाट?
राज्यातील सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री असलेले संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळविण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. माझं खातं महत्त्वाचं नसेल तर ते बंद तरी करा, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारमध्येच एक वाक्यता दिसून येत नाही. त्यातच, आज भूमिका मांडताना शिरसाट यांनी स्पष्टच शब्दात लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये देण्यात येणार नसल्याचे सांगितले.
दुसरं म्हणजे सरकार आत्ताच 2100 रुपये देऊ शकत नाही. सरकारवर सद्या बोजा आलेला आहे, ती आर्थिक घडी व्यवस्थित ठेवण्यासाठी काही पाऊलं उचलली जात आहेत. परंतु, सरकारने दिलेले आश्वासन ते पूर्ण करेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
माझ्या खात्याला इतक्या कोटींची गरज!
शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, राज्याच बजेट अडीच लाख कोटी रुपयांचं आहे. सामाजिक न्याय विभागाला साडे एकोणतीशे कोटी मिळायला हवेत. मला 22 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी 3 हजार कोटी विविध योजनेसाठी 7 हजार कोटी दिले आहेत. मला केवळ 15 हजार कोटी रुपये मिळाले, त्यातील 7 हजार कोटी दुसऱ्या योजनेला गेले आहेत. त्यामुळे, मला 3 हजार कोटी रुपये देणे आहे. मुख्यमंत्र्यांना मी लेखी पत्र दिलं आहे, अजित पवार यांना देखील विनंती केली आहे. 11.8 टक्के रक्कम मला म्हणजेच माझ्या खात्याला देणं गरजेचे आहे, असे म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली.
1500 चे 2100 करता येणार नाही
संजय शिरसाट म्हणाले की, लाडक्या बहीण बाबत मला फेब्रुवारीमध्ये फाईल आली होती त्यावेळी मी स्पष्टपणे पैसे देता येणार नाही अस लिहिलं होतं. लाडक्या बहीण योजनेचे सरकारवर बर्डन आहे. अजित पवार जाणीवपूर्वक करत असतील असं मला वाटत नाही. त्यांना गाईड करणारे सेक्रेटरी चुकीच ब्रीफ करत असणार, असे म्हणत संजय शिरसाट यांनी आपली नाराजी आणि लाडकी बहीण योजनेबद्दलची वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली. 1500 रुपयेची रक्कम 2100 करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे ती सर्वांनी मान्य केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications