लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट! 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात
Mazi Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा करणार अशी घोषणा झाल्यानंतर आता लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
येत्या सतरा ऑगस्टपासून लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्य सरकारने सांगितले होते, आता सरकारकडून ट्रायल सुरु झाली असून आजपासूनच लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते राम सातपुते यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

रक्षाबंधनाआधीच ओवाळणी
रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली.
— Ram Satpute (@RamVSatpute) August 14, 2024
3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31… pic.twitter.com/O4O16fqL8V
सध्या ट्रायल, 17 तारखेनंतर खात्यात पैसे
31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे असे ट्विट राम सातपुते यांनी केले आहे. तसेच राम सातपुते यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. सध्या ट्राम्हणून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात 17 ऑगस्टनंतरच लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे आमदार राम सातपुते यांचे ट्विट
"बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली. 3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे.
31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे." असे ट्विटमध्ये आमदार राम सातपुते यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications