लाडक्या बहिणींना एकदम एप्रिल-मे महिन्याचे 3 हजार रुपये मिळणार? कधी येणार पैसे.. घ्या जाणून
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचा लाभ मिळतो. योजनेचे दर महिन्यांचे पैसे कधी मिळतील याची निश्चित तारीख नाही, त्यामुळे वेगवेगळ्या तारखांना हा हप्ता राज्य सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करत असते.
गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला किंवा दोन महिन्यांचे एकदाच असे हप्ते दिले जातात. यावेळी अर्थात एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकाचवेळी दिला जाणार आहे, त्यामुळे महिला लाभार्थ्यांच्या खात्यात एकत्र तीन हजार रुपये येणार आहेत.

कधी मिळणार एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे, महिलांचे प्रश्न
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात जमा होतील हे सांगितले होते पण आताल तर एप्रिल महिनाही संपत आला आहे या महिन्यातील उरलेल्या सहा दिवसांत पैसे मिळतील का हा आता लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे. लाडक्या बहिणींनी आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा सवाल केला आहे. त्यावर राज्य शासनाकडून काय उत्तर येते ते पाहायचे आहे.
वरवर पाहता माध्यमांमध्ये पैसे एकत्र येणार किंवा नाही याचे वृत्त दिले जात आहे मात्र, आम्ही तुम्हाला स्पष्ट करु इच्छितो की, अद्याप राज्य सरकारने एप्रिल आणि मे महिन्यातील एकत्र मिळणाऱ्या हप्त्याबद्दल अजून ठोस माहिती जारी केलेली नाही.
दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार का?
राज्य सरकार एप्रिल महिन्याच्या हप्त्याची घोषणा येत्या एक दोन दिवसांत करु शकते जर ती झाली तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो किंवा मे महिन्यातील हप्ता मिळुन सरकार मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात दोन्ही महिन्यांचा निधी एकत्र जमा करु शकते अशी शक्यता आहे.
योजनेचे पैसे खात्यात आले की नाही, कसे समजायचे? (या टीप्स वापरा)
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे की नाही तसेच पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले गेल्यास ते आले हे कसे समजायचे यासाठी खालील पद्धतीने तुम्ही तपासू शकता त्यासाठी आम्ही तुम्हाला चार स्टेप्स सांगणार आहोत.
- तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.
- तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.
- तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.
- तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते तपासा.












Click it and Unblock the Notifications