मोठी बातमी: 'या' लाडक्या बहिणी ठरणार अपात्र; कागदपत्रांची पडताळणी सुरु, एप्रिलचा हप्ता कुणाला? वाचा
राज्यात सर्वात जास्त गाजलेल्या लाडकी बहिण योजनेची चर्चा अजूनही सुरुच आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा निधी दिला जातो. मात्र एप्रिल महिना संपत आला, तरी या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले आहे. अशातच आता या योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. आता सरकारने चारचाकी कार असलेल्या आणि एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे अनेक महिला पुन्हा एकदा अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'या' महिलांचा शोध सुरु
सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु करण्यात आल्याची माहिती काही न्यूज एजन्सीने दिली आहे. ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे, अशा महिलांचा आणि एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे आता यापुढे या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
उत्पन्नाची पडताळणी सुरु
लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या टप्प्यात महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, मात्र काही महिला यापेक्षा जास्त उत्पन्न असूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आता अशा महिलांचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. यानंतर अपात्र आढळणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळली जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
12 लाख महिलांना वगळले
योजनेची सर्वात जास्त चर्चा अजूनही सुरु आहे. परंतु योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 12 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे. यात केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे. तसेच राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यानंतर आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी करुन आणखी काही महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे. त्यामुळे अपात्र महिलांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications