Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ऑक्टोबरचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही? सोप्या पद्धतीने तपासा
Ladki Bahin Yojana marathi news : महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना 'लाडकी बहीण योजने'च्या ऑक्टोबर महिन्याच्या ₹१५०० हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. आज ४ नोव्हेंबरपासून मिळणार आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक महत्त्वाची पोस्ट करून ही मोठे अपडेट्स दिले आहेत.
या अपडेट्सनुसार, ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी निधी मंजूर झाला असून, आजपासून हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे. हा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मिळत असून तुम्ही पैसे तुमच्या खात्यात आले की नाही, हे तपासण्यासाठी खालील ४ सोप्या पद्धतींचा वापर करु शकता.

अत्यंत महत्त्वाचे: हप्ता अडकला असेल तर...
ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो! त्यामुळे, पैसे तपासण्यासोबतच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, कारण यासाठी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे.
खात्यात पैसे जमा झाले की नाही, कसे तपासावे? (४ सोपे मार्ग)
लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणताही सोपा मार्ग वापरा:
१. कस्टमर केअरला कॉल करा
तुम्ही तुमच्या संबंधित बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करून थेट तुमच्या खात्यातील शिल्लक आणि नुकतीच जमा झालेली रक्कम विचारू शकता.
२. ऑनलाईन बँकिंग/App तपासा
तुम्ही जर ऑनलाईन बँकिंग (Net Banking) किंवा बँकेचे मोबाइल ॲप (Mobile App) वापरत असाल, तर थेट लॉग इन करून बँक स्टेटमेंट डाउनलोड करा किंवा व्यवहाराचा इतिहास तपासा.
३. मोबाईल मेसेज (SMS) चेक करा
बँक खात्यात पैसे जमा होताच, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर जमा झाल्याचा मेसेज (SMS Alert) आलेला असतो. हा मेसेज तपासा.
४. थेट बँकेत जा
जे नागरिक ऑनलाईन बँकिंग वापरत नाहीत, त्यांनी जवळच्या बँक शाखेत (Bank Branch) जाऊन पासबुकवर एंट्री करून घ्यावी.
योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया
भविष्यातील हप्ते नियमित मिळावेत यासाठी ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी.
ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
- निवासाचा पुरावा (उदा. रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र)
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खात्याची माहिती
ई-केवायसी कशी पूर्ण करावी? (सोपी प्रक्रिया)
१. सर्वात आधी ladakibahin.maharashtra.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. वेबसाइटवर दिसणाऱ्या "e-KYC" या पर्यायावर क्लिक करा.
३. आवश्यक माहिती अचूक भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
४. माहिती सबमिट करा.












Click it and Unblock the Notifications