Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आदिती तटकरे यांची लाडक्या बहि‍णींबाबत महत्वाची घोषणा; म्हणाल्या, लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली...

महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजनेबाबत रोज चर्चा सुरु असते. महाराष्ट्रातील आत्तापर्यंत सर्वाज जास्त यशस्वी झालेली ही योजना महिलांसाठी विशेष ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिण योजनेच्या निकषांत काही बदल झाल्याच्या आणि त्यांची संख्या कमी होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. याच बातम्यांसंदर्भात आज मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

Aditi Tatkare

काय म्हणाल्या तटकरे?

लाडकी बहिण योजनेच्या निकषात बदल झाल्याचे व त्यांच्या अर्जाची छाननी सुरु असल्याच्या चर्चा होत्या. पत्रकारांनी आज मंत्री तटकरे यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी त्या म्हणाल्या, लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेच्या निकषात आम्ही कोणताही बदल केलेला नाही. ज्या गरजू महिला आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच लाभ मिळणार आहेत. आम्ही त्यात कुठलाही बदल केलेला नाही, आणि बदल करणारही नाही, अशी थेट घोषणा मंत्री तटकरे यांनी केली.

किती अर्ज ठरले बाद

लाडकी बहिण योजनेचे अर्ज बाद होत असल्याबाबत मंत्री तटकरे यांना विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, ऑगस्ट महिन्यात लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांचे ७० ते ७५ हजार अर्ज अपात्र ठरले होते. या लाभार्थ्यांसंदर्भात काही तक्रारी होत्या. या तक्रारीनंतर अर्ज छाननीत ते अपात्र आढळल्याने बाद करण्यात आले, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, अचानक लाभ्यार्थ्यांची संख्या कमी झालेली नाही. तक्रारी आल्यानंतर ते अर्ज छाननी करण्यात आले. या योजनेबाबत जो शासन निर्णय काढला होता व त्यात ज्या अटी व शर्ती दिल्या होत्या, त्यात कोणताही बदल झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फेब्रुवारीचा हप्ता कधी?

ही योजना सुरु झाल्यापासून लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची छाननी सुरु होती. ऑक्टोबरमध्येही ती होती. डिसेंबरमध्येही ती झाली आहे, मात्र विरोधक निवडणुकीनंतर अर्जांची छाननी सुरु केल्याचा अपप्रचार करतात, असा आरोप मंत्री तटकरे यांनी केला. आम्ही कुठल्याही गरजू महिलेचे नाव कमी केलेले नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहि‍णींचा या महिन्याचा हप्ता बँकेत जमा होईल, असे चित्र आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+