Ladki Bahin Yojna : महिलांनो तुमचं खातं चेक करा, लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळण्यास प्रारंभ!
Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची राज्यातील महिलांना प्रतीक्षा आहे. अशातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. तर एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यास सुरूवात झाली आहे, त्यामुळे महिलांनो तुमचं खातं चेक करा, आता रक्कम कधीही तुम्हाला मिळणार आहे.

...या महिलांना फक्त 500 रुपये मिळणार!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपयेच मिळणार आहे.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) May 2, 2025
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही… pic.twitter.com/K8I5wo6Asq
मंत्री आदिती तटकरे यांनी काय दिली माहिती?
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असे आदिती तटकरे म्हणाल्या.
एप्रिलचा हप्ता देण्यास का झाला विलंब?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जातात. मात्र, यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे.
आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळतील. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हफ्ता थकला असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून दिली जात आहे.
फेब्रुवारी-मार्चचा हप्ता 8 मार्च रोजीच देण्यात आला होता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळेल, असे आदिती तटकरे म्हणाल्या. यापूर्वी लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले होते. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचेही पैसे दिले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
किती लाभार्थी महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागाकडून चालवण्यात येते. आतापर्यंत या योजनेच्या 9 हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा झालेली आहे. पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 13,500 रुपये मिळाले. मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल. पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी मिळणाऱ्या महिलांची संख्या 7,74,148 इतकी आहे. त्यामुळं या महिलांना या योजनेतून केवळ 500 रुपये दिले जाणार आहेत.












Click it and Unblock the Notifications