Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, जून महिन्याचे 1500 रुपये लवकरच खात्यात जमा होणार

राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता लवकरच थेट बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

ladki bahin yojana june

3600 कोटींचा निधी वितरीत

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी माहिती दिली की, या योजनेसाठी जवळपास 3600 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. हे पैसे डिजिटल पद्धतीने थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. हे पैसे 30 जून रोजी जमा होतील, असंही त्यांनी जाहीर केलं.

योजनेची वर्षपूर्ती

ही योजना 29 जून 2024 रोजी सुरु झाली होती आणि त्या दिवसापासून सतत 11 हप्ते महिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. प्रत्येक हप्त्याची रक्कम 1500 रुपये असून, आतापर्यंत या योजनेतून एकूण 16 हजार 500 रुपये पात्र महिलांना मिळाले आहेत.

500 रुपयांचा विशेष हप्ता

या योजनेतील काही महिलांना मात्र दरमहा 500 रुपये दिले जातात. कारण त्या महिला केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' आणि राज्याच्या 'नमो शेतकरी सन्मान निधी' या दोन्ही योजनांचे लाभार्थी असतात. शासनाच्या धोरणानुसार, एका लाभार्थीला वर्षभरात 18 हजार रुपयांपर्यंतच रक्कम देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे 12 हजार रुपये त्या दोन योजनांतून मिळतात आणि उर्वरित 6 हजार रुपये 'लाडकी बहीण' योजनेतून दिले जातात.

या महिलांची संख्या किती?

या श्रेणीतील महिलांची संख्या सुमारे 7 ते 8 लाखांच्या दरम्यान आहे. त्या सर्व महिलांना 500 रुपयांचा मासिक हप्ता मिळतो. ही रक्कमही इतरप्रमाणेच थेट बँक खात्यात जमा केली जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+