Ladki Bahin Yojana : खूशखबर..लाडक्या बहिणींनो बँक खाते पटापट तपासा! रक्षाबंधनआधीच आला जुलैचा हप्ता
Ladki Bahin Yojana July installment begins : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर आली आहे. जुलै महिन्याचा दीड हजारांच्या हप्त्याचे वितरण सुरु करण्यात आले असून यासंदर्भात खुद्द महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज ७ ऑगस्ट रोजी ही माहिती दिली आहे. खास बाब म्हणजे यंदा रक्षाबंधनाआधीच लाभार्थ्यांना दिड हजार रुपयांचा हप्ता वितरीत केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२५ पासून या हप्त्याचे वितरण सुरु करण्यात आले आहे. आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी त्यांचे बँक खाते पटापट तपासल्यास खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती समजणार आहे.

यंदा रक्षाबंधननिमित्त नऊ ऑगस्ट रोजी आहे पण त्यापुर्वीच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार, लाभार्थ्यांना रक्षाबंधनापुर्वीच जुलै महिन्याचे पैसे खात्यात जमा करणे सुरु ाल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले होते, त्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात पुढारीने वृत्त दिले आहे.
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर हप्त्याचे वितरण
राज्यात लाडकी बहिण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे, सरकार या योजनेतील पात्र महिलांना प्रतीमहिना दीड हजार रुपये देत आहे. या योजनेची वर्षपुर्ती झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पात्र लाभार्थी महिलांना दिड हजारांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण सुरु झाले होते.
राज्यात बोगस लाभार्थ्यांवर कारवाईचा दणका राज्य सरकारकडून सुरु आहे.आधी या योजनेत महिलांच्या नावे पुरुषांनी शिरकाव केला होता, त्यानंतर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला तर आणखी काही बोगस पण पात्र असल्याचे भासवून सरकारी लाभ उचलण्याचा प्रयत्न काहींजणांकडून सुरु होता आता सरकारने छाटणी सुरु केली असून पडताळणीसाठी अजून १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे, त्यानंतर ज्या पुरुषांनी अथवा अपात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई होणार आहे असेही सरकारमधील मंत्र्यांनी यापुर्वीच इशारा दिला आहे.
खात्यात पैसे जमा झाले का नाही? असे तपासा
नारी शक्ती दूत अॅप डाउनलोड करा
सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून "नारी शक्ती दूत" अॅप डाउनलोड करा. हे अॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.
लॉगिन प्रक्रिया
अॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि "लाडकी बहीण योजना" पर्याय निवडा.
मंजूर यादी तपासणी
अॅपच्या मुख्य पानावर "मंजूर यादी" किंवा "अर्जाची स्थिती" हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
पोर्टलवर तपासणी कशी करायची?
अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. "अर्जदार लॉगिन" पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि "मंजूर यादी" विभागात जा आणि तपासा.
आवश्यक माहिती भरा
दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
तुमच्या प्रक्रियेची स्थिती तपासा
अॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
ऑफलाइन पर्याय काय आहे?
जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.












Click it and Unblock the Notifications