Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' तारखेनंतर 1500 रुपये जमा होणार!

Ladki Bahin Yojana Installment Postponed : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'च्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो लाभार्थी महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमुळे आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मतमोजणीमुळे, योजनेचे पैसे ३ डिसेंबरनंतरच महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची आशा आहे, मात्र हे पैसे कधी मिळतील याची निश्चिती सरकारतर्फे दिली गेली नाही पण सुत्रांनी सांगितल्यानुसार, सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने, हप्ते वितरणाची प्रक्रिया काहीशी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता ३ डिसेंबर २०२५ नंतरच आपल्या खात्यात ₹१५०० जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Ladki Bahin Yojana Installment

लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचे मोठे गिफ्ट

या महत्त्वाकांक्षी योजनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या यशस्वीतेवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून महिलांचा आत्मविश्वास आणि समाजात सन्मान वाढवणारी आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवून त्यांना 'एक लाख रुपये कमवणारी' उद्योजिका बनवण्याचे आमचे ध्येय आहे. या योजनेचा उद्देश निवडणुकीपुरता मर्यादित नसून, महिलांच्या सक्षमीकरणाचा तो एक सामाजिक प्रयत्न आहे, आणि येणाऱ्या काळात आम्ही यात आणखी निधी वाढवणार आहोत."

योजनेचे पैसे कधी मिळणार?

निवडणुकीनंतर त्वरित निधीचे वितरण सुरू होईल आणि कोणत्याही पात्र लाभार्थीचा हप्ता थांबणार नाही, असे आश्वासन सरकारी सूत्रांनी दिले आहे. खास म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र मिळतील अशी शक्यता आहे, पण आर्थिक स्थिती पाहता एक खात्याचा निधी दुसऱ्या खात्यात वळवून पैसे देण्याचा प्रयत्न टाळला जाईल त्यामुळे तसे होणे तूर्त घडीला अवघड दिसते म्हणूच नोव्हेंबरचाच एक हप्ता मिळेल अशी शक्यता आहे.

लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची सूचना

ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप आपले ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांनी १८ नोव्हेंबर २०२४ ही अंतिम मुदत ओलांडल्यामुळे पुढील हप्ता मिळवण्यासाठी तातडीने हे काम पूर्ण करून घ्यावे. ई-केवायसी नसलेल्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+