Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ladki Bahin Yojana :लाडक्या बहीणींसाठी मोठी बातमी! तुम्ही पात्र की अपात्र? सतत्या आयकर विभाग तपासणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या योजनेतील अपात्र लाभार्थ्यी शोधण्यासाठी प्राप्तिकर विभागाला अहवाल मागितला आहे. या योजनेत अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी ही प्रक्रीया केली जाणार असून यासंदर्भात प्राप्तिकर विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग एक सामंजस्य करार करणार आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल.

राज्य सरकारचा महिला व बालकल्याण विभाग आणि प्राप्तिकर विभागाची नुकतीच एक बैठक झाली. त्यानंतर यासंदर्भात चर्चा पुढे आली असून महाराष्ट्र टाईम्सने मंत्रालयातील सुत्रांचा हवाला देत हे वृत्त दिले आहे. त्यानुसार, लाडक्या बहिणींची गोपनियता कायम ठेवण्यासाठी हा सामंजस्य करार केला असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

Ladki Bahin Yojana

लाडकी बहिण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेमार्फत जवळपास पावने दोन कोटी लाभार्थी महिलांना राज्य शासन दर महिन्याला दीड हजार रुपये मानधन देते. आता या योजनेत अनेक अपात्र लाभार्थी आहेत आणि बोगस लाभार्थ्यांनी शिरकाव केल्याचे राज्य सरकारने केलेल्या पडताळणीत समोर आले आहे. त्यामुळेच आता अपात्र लाभार्थ्यांच्या छाटणीचे काम जोरात सुरु आहे.

Take a Poll

बालकल्याण विभाग विभाग-राज्यसरकारला प्राप्तिकर विभागाच्या या अलहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालासंदर्भातील सामंजस्य करारावर प्रक्रीया सुरु असून लवकरच यासंदर्भात घोषणा होणार आहे. या अहवालात गोपनिय माहितीचा गैरवापर टाळण्याचे, लाभार्थ्यांचा डेटा लिक होऊ नये यासंदर्भातही गोपनियता कायम ठेवण्यासाठी करार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

असे तपासा.. खात्यात पैसे जमा झाले की नाही..

नारी शक्ती दूत अ‍ॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून "नारी शक्ती दूत" अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.

लॉगिन प्रक्रिया: अ‍ॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि "लाडकी बहीण योजना" पर्याय निवडा.

मंजूर यादी तपासणी (अ‍ॅप): अ‍ॅपच्या मुख्य पानावर "मंजूर यादी" किंवा "अर्जाची स्थिती" हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.

पोर्टलवर तपासणी: अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. "अर्जदार लॉगिन" पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि "मंजूर यादी" विभागात जा.

आवश्यक माहिती: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.

स्थिती अद्ययावत: अ‍ॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.

ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+