Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडकी बहिण योजनेमुळं शासनाने घराघरात भांडणं लावली! सुप्रिया सुळेंचे विधान, 'ही' केली फायद्याची मागणी

Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहिण योजनेला प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे, असे असले तरीही आता लाडकी बहिण योजनेतील निकषासंदर्भात मोठी चर्चा आहे. अशातच या योजनेच्या लाभार्थी महिला पात्रतेसंदर्भात थोड्या चिंतीत आहेत, कारण सरकारकडून पात्रतेसंदर्भात पडताळणी केली गेली. त्यातच जवळपास ४२ लाख महिलांना जुलैचा हप्ता मिळाला नाही अशी चर्चा आहे.

Ladki Bahin Yojana

Take a Poll

लाडकी बहिण योजनेच्या जोरावर राज्यात महायुती सरकार स्थापन झाले आहे. लाभार्थ्यांनी सत्ताधारी पक्षांना भरभरुन मतदान केले आहे. लाडकी बहिण योजनेची वर्षपूर्ती झाली असून यंदा तेरावा हप्ता लाभार्थ्यांना मिळाला आहे. अशातच लाडकी बहिण योजनेवरुन सरकारवर अजूनही विरोधक निशानाच साधत असून सुप्रिया सुळेंची एक्सपोस्ट चर्चेत आली आहे.

" लाडकी बहिण योजनेमुळे शासनाने अक्षरशः घराघरात भांडणं लावली असं म्हणता येईल. आता शासनानेच ही भांडणं सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसकट पात्र महिलांना या योजनेचा लाभ द्यावा" असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. तसा संदेश त्यांनी आपल्या एक्स या समाज माध्यमातून दिला आहे.

लाडकी बहिण योजनेचे निकष पावसाच्या अंदाजासारखे बदलताहेत

सुप्रिया सुळेंनी एक्सवपर पोस्ट केल्यानुसार, सुप्रिया सुळेंनी सरकारकडे मागणी केली व काहीअंशी आरोपही केला आहे. त्या म्हणाल्या, "शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहेत. पण त्यामुळे चांगल्या हसत्या-खेळत्या घरांमध्ये सासू-सुना, जावा-जावा, ननंद-जाऊ यांच्यात भांडणं लागली आहेत."

शासनाने घराघरात भांडण लावली हे म्हणता येईल

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "घरातील ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागली आहेत. यामुळे अनेक घरांची शांतता बिघडली आहे. शासनाने अक्षरशः घराघरात भांडणं लावली असं म्हणता येईल. आता शासनानेच ही भांडणं सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसकट पात्र महिलांना या योजनेचा लाभ द्यावा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+