Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहिणींची एकनाथ शिंदेंना साथ

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली. पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणारी योजना अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून लाभार्थी महिलांना तीन हप्ते अदा करण्यात आले आहेत. या योजनेसाठी अजूनही महिलांची नोंदणी सुरू आहे. विरोधकांनी या योजनेला बदनाम करण्याचा प्रचंड प्रयत्न केला मात्र विरोधकांच्या अपप्रचारावर अजिबात विश्वास न ठेवता महिलांनी या योजनेला प्रतिसाद दिला.

निवडणूक काळात या योजनेच्या अंमलबजावणीस निवडणूक आयोग अडथळा आणणार, ही शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एका हप्त्याची रक्कम अगोदरच जमा केली होती. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद केली जाणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उप मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे महिलांचा सरकारवरचा विश्वास अधिक दृढ होऊ लागला असून, महिला वर्गाच्या मनात सरकारबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

Cm Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलींना मोफत उच्च शिक्षण, महिलांना अर्ध्या दरात बस प्रवास, वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना अशा विविध योजना आखून त्यांची यशस्वी अंमलबजावणी सुरू केली. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विविध भागात पात्र लाभार्थी महिलांच्या गाठीभेटी घेतल्या. त्या तिघांनाही महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातावर राखी बांधण्यासाठी महिला वर्गाची प्रचंड गर्दी होते आणि कार्यक्रम संपेपर्यंत शिंदे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरून गेलेले असतात. विशेषतः महिला वर्गात शिंदे यांची लोकप्रियता सध्या अत्युच्च शिखरावर आहे.

महिलांकडून योजनेचा सदुपयोग

या योजनेतून मिळालेल्या रकमेचा योग्य वापर करून काही महिलांनी स्वयं रोजगार सुरू केल्याची उदाहरणे ताजी आहेत. एका महिलेने तर प्राप्त झालेल्या पैशातून दोन हांडे विकत घेऊन त्यावर "मुख्यमंत्री भावाकडून सप्रेम भेट" असे नाव गोंदवून घेतले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या महिलेची आपुलकीने चौकशी आणि विचारपूस केली. त्यावेळी सदर महिलेने मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या महिलांनी एकनाथ शिंदे यांचा प्रवेश होताच उभे राहून त्यांचे स्वागत केले. महिलांसाठी काम करणारा मुख्यमंत्री अशी एकनाथ शिंदे यांची प्रतिमा समस्त महिला वर्गात निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार, असा सूर महिलावर्गात उमटत असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांना महिला वर्गातून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांची धाकधूक वाढली असून त्यांनी अजूनही माझी लाडकी वहिनी योजनेची बदनामी सुरूच ठेवल्याचे जाणवत आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांचाही महिलांशी संवाद

शिवसेनेचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे हे विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत असतात. तसेच संघटनात्मक बांधणीची पाहणी करण्यासाठी राज्यभर फिरत असतात. या दौऱ्या दरम्यान त्यांचा महिलांशी विशेषत्वाने संवाद होतो. विशेषतः लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला त्यांच्याशी अधिक संवाद साधत असल्याचे दिसून येते. आपल्या गावाच्या किंवा परिसराच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबी या महिला श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून देतात आणि श्रीकांत शिंदे देखील त्या बाबींची तातडीने पूर्तता करून घेतात असेही वारंवार दिसून आले आहे.

परभणीच्या महिलांनी सांगितली समस्या

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा संपूर्ण राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद दौरा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान मागील आठवड्यात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा परभणी येथे जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळावा संपल्यानंतर काही महिला - भगिनींनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन परभणी येथील संभाजी नगर परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याचे त्यांना कळविले. तर या रस्त्यावर अनेकदा आमच्या कुटुंबियांचे अपघात देखील झाल्याचे सांगत रस्त्याचे काम करून देण्याची विनंती केली.

खासदार शिंदे यांनी तातडीने घेतली दखल

याची तातडीने दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील तातडीने दखल घेतली आणि अवघ्या एक दिवसाच्या कालावधीत रस्त्याच्या उभारणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर येथील स्थानिक भगिनी शोभा गायकवाड यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधून आभार मानले.

तर आम्ही सर्व लाडक्या बहिणी शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मागे ठामपणे उभे आहोत, असे मत यावेळी शोभा गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी गावातील तरुण आणि अन्य नागरिकांनीही एकनाथ शिंदे यांनाच ठामपणे पाठिंबा देणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. एकनाथ शिंदे यांचा ग्रामीण भागात विशेषतः महिलांची असलेला कनेक्ट वाढत आहे. याचाच फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना थेट होणार असल्याचे दिसून येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+