Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार, कधी अन् कसे वाचा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी खूशखबर समोर आली आहे. लाडक्या बहिणींसाठी आधीच भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे, अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक गोड बातमी दिली आहे. लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत 40 हजारांपर्यंत कर्ज दिलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहिण योजनेतील महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे. यंदा दहावा हप्ता वितरीत झाला आहे. आता सरकार या योजनेसाठी आणखी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Ladki Bahin Yojana

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजीत पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, लाडक्या बहिणींना राज्यसरकार दरमहा दीड हजार रुपये देते, या योजनेवर जवळपा, 45 हजार कोटी रुपये खर्च होतात. या योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हप्त्यात थोडासा विलंब झाला तर विरोधक ही योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवतात, त्यावर विश्वास ठेवू नका. ही योजना बंद होणार नाही असेही ते म्हणाले.

कर्जाबद्दल अजित पवारांची माहिती

अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. मी जिल्ह्यातील बँकेसोबत संवाद साधणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या असून लाभार्थ्यांना चाळीस हजारांपर्यंत कर्ज देऊन कर्जाचा हप्ता योजनेतून वळते केले जातील असंही ते म्हणाले.

राज्य सरकारचा किती होता या योजनेवर खर्च

मध्यप्रदेशात तत्कालिन भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी लाडकी बहिण योजना त्यांच्या राज्यात आणली होती, तिथे या योजनेचे यश पाहत हीच योजना महायुतीने महाराष्ट्रात आणली आहे. गेल्या निवडणुकीतही या योजनेमुळे महायुती सरकारला जनमताचा मोठा लाभ झाला आहे आणि या निवडणुकीत लाडक्या बहिणींना महायुतीने मोठे आश्वासन दिले होते. आता आश्वासन पुर्तीकडे सरकारची वाटचाल सुरु झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+