Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ladki Bahin Yojana:खूशखबर! लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार; पैसे यायला उशीर का झाला? वाचा

Ladki Bahin Yojana : राज्यात लोकप्रिय झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जोमात असून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार आहे. महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली असून दोन दिवसांपुर्वीच खात्यात पैसे येणार होते पण ते आले नाही. हे पैसे यायला का उशीर झाला याचेही एक मोठे कारण समोर आले आहे.

महायुती सरकार लाडक्या बहि‍णींबाबत संवेदनशील असून या योजनेत कोणतीही कसर ठेवता कामा नये, यासाठी सर्व महिला आणि बालविकास विभाग तसेच स्वःत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेकडे जातीने लक्ष केंद्रीत करत आहेत. या महिन्याचे दीड हजार रुपये आजपासून खात्यात यायला सुरुवात होत आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींनी आपले बँक अकाऊंट तपासायला हरकत नाही.

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींना आजपासून 1500 रुपये मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर साधारणपणे 9 लाख महिलांची संख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे.

पैसे द्यायला उशीर का झाला?

फेब्रुवारी महिना संपायला फक्त 4 दिवस बाकी आहेत, अशा स्थितीत पैसे खात्यात न आल्याने अनेक लाभार्थ्यांनी चौकशी करणे सुरु केले होते, की, या महिन्याचा हप्ता कधी येणार पण त्याबद्दल ठोस माहिती आता समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आजपासून दिला जाणार आहे. या संदर्भात महिला व बाल विकास विभागाने माहिती दिली. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे. काही तांत्रिक बाबीमुळे हे पैसे महिला आणि बालकल्याण विभागाला देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती, त्यामुळे यंदा थोडा विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली. येत्या आठवड्यात पैसे मिळण्यास सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 हप्त्यांचे 10 हजार 500 लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. आता आठव्या हप्त्याचे 1500 रुपयेही लवकरच खात्यात पडणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+