'या' दिवसाअखेर होऊ शकतो लाडक्या बहिणींच्या खात्यात जूनचा हप्ता, जाणून घ्या कोण पात्र; कोण अपात्र?
Ladki Bahin Yojana beneficiaries 12th installment : लाडकी बहिण योजना राज्यातील महत्वकांक्षी योजना असून महिलांचे उत्थान यातून व्हावे हा मुळ उद्देश राज्य सरकारचा आहे. आतापर्यंत राज्य सरकारने ११ हप्ते दिले असून आता जूनच्या बाराव्या हप्त्याची वाट लाभार्थ्यांना आहे. जूनचा दीड हजार रुपयांचा हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.
लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता देण्यास राज्य सरकारला विलंब झाला होता. हा हप्ता तीन जूननंतर देण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असतानाच जवळपास अडीच हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेत अर्ज नोंदणी केल्याचे समोर आले होते, त्यामुळे पडताळणी प्रक्रीया चोखपणे सुरु असून हप्ता येण्यास विलंबासाठी हे एक कारण होते.

कधी मिळणार जूनचा हप्ता? (Ladki Bahin Yojana beneficiaries 12th installment)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना या महिन्यातील जूनचा हप्ता लवकरच मिळणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या महिन्याच्या शेवटी राज्य सरकार यासंदर्भात माहिती देऊ शकते. या महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून हप्ता देण्यास सरकार सुरु करु शकते. त्यामुळे गेल्यावेळी झालेला विलंब यावेळी होणार नाही असेही म्हटले जात आहे.
या महिलांनाच मिळणार योजनेचा लाभ
लाडकी बहिण योजनेत अनेक बोगस लाभार्थ्यांनी शिरकाव केला आहे, त्यामुळे मुळ लाभार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासन नोंदणी झालेल्या अर्जाची पडताळणी करत आहे. अशातच काही बोगस प्रकरणे उद्भवल्यानंतर लाभार्थ्यांच्या पात्रतेबद्दलही पुन्हा विचारले जात आहे. आम्ही सांगतो की, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे.
या महिलांना मिळणार नाही लाभ
ज्या कुटुंबाचे, महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही. ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील. कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही असे याआधीच राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.












Click it and Unblock the Notifications