Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana Update : महायुती सरकारची लाडकी बहिण योजना ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची योजना आहे. लाडकी बहिण योजनेनेमुळेच महायुती सरकारला दुसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यात म्हणजेच 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

ladki bahin yojana

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?

दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिला एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार अशी विचारणा होताना दिसत आहे. याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती सुद्धा समोर आली आहे. लाडक्या बहीणींना एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्क्रूटिनीनंतर आता किती लाभार्थी वगळले जाणार थोड्याच दिवसात समजणार आहे.

लाडकी बहिण योजनेतून अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात सुरु झाली. आत्तापर्यंत लाडकी बहिण योजनेचे 9 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र अजून एप्रिलचा 10 हप्ता मिळालेला नाही. मात्र मिळालेल्या माहीतीनुसार एप्रिलच्या महिन्याच्या 30 तारखेला लाडक्या बहीणांना त्यांचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

2100 रुपये कधी मिळणार?

विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र महायुती आघाडीने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु पुन्हा निवडणूक जिंकून काही महिने उलटूनही सरकार हे आश्वासन पूर्ण करू शकलेले नाही. महाराष्ट्रातील महिलांना वाढीव रकमेचा लाभ लाडक्या बहीणांना कधी पर्यंत मिळेल याबद्दल आता चर्चा सुरु आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+