Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! 2 लाख अर्ज बाद! 'हे' लाभार्थ्यांना मिळणार नाही हप्ता
Ladki Bahin Yojana : माझी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा राज्यात बोलबाला आहे. पण आता या योजनेतील काही लाभार्थ्यांची छाटनी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार याआधी अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी मोहिम सुरु करण्यात आली, त्यात जवळपास पाच लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्या होत्या. त्यानंतर आता आणखी दोन लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना धक्का!
महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेत मोठे पाऊल उचलले. यानंतर महाराष्ट्रातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची सखोल चौकशी करून ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबांची माहिती घेण्यासाठी फडणवीस सरकारने आयकर विभागाची मदत घेतली आहे.

कुणाचे होणार अर्ज बाद?
विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांसाठी काही निकष ठरवले आहेत. त्यानंतर आता सरसकट अर्ज मंजूर करुन घेण्याऐवजी लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. अर्ज पडताळणीत ज्या लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन आहे अशा यासह कर भरणाऱ्या महिला, जमीन असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तसेच त्यांना फेब्रुवारी 2025 चा हप्ता मिळेल का नाही याची शाश्वतीही नाही.
हेही वाचा : Aadhar Bank Account Linking:आधी हे काम करा! बँक-खाते आधार लिंक कसे करायचे स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
काय आहे पात्रता?
या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना मासिक 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या उपक्रमाला राज्यभरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, जवळपास 2 कोटी महिलांना मदत झाली, त्यामुळे या मोठ्या पाठिंब्याने विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारची पुनर्निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तथापि, उत्पन्नाच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे, योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत घट होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा : लाडकी बहिण योजनेचे पैसे अडकलेय? आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का, ते कसं करायचं? घ्या जाणून
लाडक्या बहीणींना आता KYC चा नवीन नियम
राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शाहनिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी E-KYC करण्यात येणार आहे. गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत.
काय आहेत नवी नियम
- लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य केले आहे.
- राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- 'लाडकी बहीण योजने'वर आता आयटीची नजर आहे. लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार आहे.
- लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार आहे.
- अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही
- जिल्हास्तरावरून फेरतपासणी करुन निकषात न बसलेल्यांना अपात्र करण्यात येणार आहे.
अजूनही 11 लाख अर्जाची आधारशी जोडणी?
लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील तब्बल 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. अजूनही 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे. ज्यांचे आधार कार्ड कनेक्ट होणार नाही, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications