अबब! लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत १७,५०० कोटी वाटले; २१०० रुपये मिळणार का? मोठी अपडेट आली समोर
महाराष्ट्र्रातील सर्वात लोकप्रिय योजना असलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत आज अर्थमंत्री अजित पवारांनी विधामंडळात माहिती दिली. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल त्यांनी आज शुक्रवारी सादर केला. लाडकी बहिण योजनेत जून २०२४ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत किती निधीचे वाटप झाले, याची माहितीच त्यांनी मांडली. आता लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१००० रुपये मिळणार का, हा प्रश्न चर्चेत आला आहे.

काय म्हणाले अजित पवार?
अर्थमंत्री अजित पवार आज विधीमंडळात महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला. या अहवालात राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली. या योजनेत जून २०२४ पासून डिसेंबर २०२४ या सात महिन्यांत २ कोटी ३८ लाख लाभार्थी महिलांना निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा निधी तब्बल १७ हजार ५०५ कोटी रुपयांचा आहे. जून ते डिसेंबर या सात महिन्यांत लाभार्थी महिलांना १५०० रुपये महिना देण्यात आले.
२१०० रुपये मिळतील का?
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजनेच्या मानधनात तब्बत सहाशे रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान टाकल्याचे सांगितले जातेय. आता निवडणूक होऊन महायुती विजयी झाली असल्याने आश्वासन दिल्याप्रमाणे २१०० रुपये कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आता सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का, हे स्पष्ट होणार आहे.
लेक लाडकी योजनेत वाढ
महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरु केली आहे. त्यात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात २ हजार ८८९ लाभार्थी होते. त्यांना ७ कोटी ७९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. परंतु सन २०२४-२५ मध्ये त्यात मोठी वाढ झाली. लाभार्थ्यांची संख्या एक लाख चार हजारावर पोहचली. त्यांनी ५२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. माझी कन्या भाग्यश्री योजनेत सन २०२३-२४ मध्ये ६ कोटी ७८ लाखांचा निधी देण्यात आला. तो सन २०२४-२५ मध्ये १३ कोटी २० लाख झाला आहे.












Click it and Unblock the Notifications