लाडकी बहीण योजनेची अफाट लोकप्रियता! विदर्भ, संभाजीनगर, हिंगोलीच्या महिलांची एकनाथ शिंदे यांना साथ
Ladki Baheen Yojana : पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमहा दीड हजार रुपये देणारी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या योजनेला महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत असून दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. आतापर्यंत तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून पुढील दोन हप्ते एकत्रित जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच अमरावती, अकोला, छत्रपती संभाजी नगर आणि हिंगोली या जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
हक्काचे दीड हजार.. जीवनाला मिळाले स्थैर्य
पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा ग्रामीण भाग तुलनेने मागास समजला जातो. उद्योगधंद्यांची या परिसरात कमतरता असल्यामुळे महिलांना शेती वगळता अन्य रोजगाराचे स्त्रोत नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे येथील महिलांना हक्काचे दीड हजार रुपये दरमहा मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाला स्थैर्य आले आहे.

विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले
विरोधकांनी या योजनेच्या विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार केला. महिलांना एवढे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसेच नाहीत, निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल, पैसे जमा होतात काढून घ्या अन्यथा हे पैसे सरकार काढून घेईल असा अपप्रचार विरोधकांनी केला. विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी या योजनेच्या विरोधात न्यायालयात याचीकाच दाखल केली. विरोधी पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांनी या योजनेच्या पोर्टलवर जंक डाटा टाकून पोर्टल जाम करण्याचा प्रयत्न केल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत बोलताना स्पष्ट केले होते.
बहिणींची माया, हंड्यावर लिहिले एकनाथ शिंदे यांचे नाव
सध्या एक नवा नॅरेटिव्ह विरोधकांकडून पसरविला जात आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दर आठवड्याला 3000 कोटी रुपयांचे कर्ज काढत आहे, या योजनेवर वित्त विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, या योजनेमुळे अन्याय योजनांसाठी सरकारकडे पैसेच उरलेले नाहीत अशा बाबी विरोधकांकडून सातत्याने कानी कपाळी ओरडून सांगितल्या जात आहेत. मात्र सरकार या योजनेचा अंमलबजावणीवर ठाम आहे.
आतापर्यंत तीन हप्त्यांचे प्रत्येकी साडेचार हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. अजूनही या योजनेसाठी नोंदणी करण्यात येत असून महिलाही त्याला उत्तम प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. काही महिलांनी या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून व्यवसाय सुरू केला आणि त्यातून चांगला नफा मिळवल्याच्या घटना घडल्या आहेत. एका महिलेने तर या योजनेतून मिळालेल्या पैशाने दोन हांडे विकत घेऊन त्यावर " मुख्यमंत्री भावाकडून सप्रेम भेट" असे नाव करून घेतले आहे.
योजना बंद केली जाणार नाही - मुख्यंत्र्यांची ग्वाही
"कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद केली जाणार नाही, या योजनेंतर्गत दिली जाणारी रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठासून सांगत आहेत. "महायुती सरकार हे देणारे सरकार असून घेणारे सरकार नाही", अशी भूमिकाही एकनाथ शिंदे यांनी सातत्याने मांडली आहे. काम करणारा माणूस अशी त्यांची ओळख जनमानात निर्माण झाली आहे. त्यामुळेच अमरावती, अकोला, छत्रपती संभाजी नगर आणि हिंगोली या जिल्ह्यातील महिलावर्ग एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे चित्र शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान दिसून आले आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications