Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुर्ला अपघात प्रकरणातील संजय मोरेबाबत कोर्टाचा 'हा' महत्त्वाचा निर्णय; वाचा, कोर्टात नेमकं काय घडलं

Kurla bus accident- कुर्ला येथील अनियंत्रित बसच्या अपघातात आत्तापर्यंत सात जणांना आपले प्राण गमवावे लागले. या प्रकरणातील आरोपी बस ड्रायव्हर संजय मोरे याला आज कोर्टात हजर करण्यात आले. तत्पूर्वी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला व्हिसीद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी मागितली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळली. त्यानंतर आरोपीला प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्यात आले.

Kurla bus acciden

कोर्टाने पोलिसांची ती मागणी फेटाळली

कुर्ला बस अपघातातील आरोपी संजय मोरे याला आज कोर्टात हजर करायचे होते. मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला व्हिसीद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज केला होता. मात्र पोलिसांचा हा अर्ज कोर्टाने फेटाळला. त्यामुळे पोलिसांना आरोपी संजय मोरे याला प्रत्यक्ष कोर्टात हजर करावे लागले. कोर्टाने त्यानंतर पोलिस व आरोपी या दोघांचाही युक्तीवाद ऐकून घेतला.

पोलिसांची पोलिस कोठडीची मागणी

आरोपीचे काही षडयंत्र आहे का..? त्याच्यासोबत इतर कुणी त्यात सहभागी आहे का..? आरोपीने नशा केला होता का..? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी किमान सात दिवसांची पोलिस कोठडी कोर्टाकडे मागितली. पोलिसांच्या या मुद्यावर आरोपीच्या वकीलांनी सर्व मुद्दे खोडून काढले. आरोपीची वैद्यकीय तपासणी झाली आहे. तो रिपोर्ट पोलिसांकडेच आहे. शिवाय आरोपीचे प्रशिक्षण झाले की नाही, हे पोलिसांना बेस्ट प्रशासनाकडून कळेल, असे म्हणत पोलिस कोठडीची गरज नसल्याचे कोर्टाला सांगितले.

कोर्टात रंगला युक्तीवाद

या अपघातात आरोपीने ३०० मीटर अंतराच्या परिसरात तब्बल ५० ते ६० गाड्यांना धडक दिली होती. या गाडीत पँसेंजरही होते. ड्रायव्हरने ही गाडी बेदरकारपणे चालवली, असा आरोप पोलिसांनी कोर्टासमोर केला. त्यामागे हेतू काय होता? हा कट आहे का? यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करायचा आहे असे पोलिसांचे म्हणणे होते. त्यामुळे आरोपीची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद पोलिसांनी कोर्टात केला. नंतर आरोपीची कोठडी कशासाठी हवी आहे? असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला. "बेस्ट प्रशासनाला योग्य तो पत्रव्यवहार करून पोलिस हवी ती माहिती घेऊ शकतात, असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं. या मुद्यावर दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तीवाद झाला.

कोर्टाने दिली २१ डिसेंबरपर्यंत कोठडी

दोन्ही बाजूने युक्तीवाद रंगल्यानंतर पोलिसांनी एक महत्त्वाचा मुद्दा कोर्टापुढे मांडला. या बसचा हत्यार म्हणून वापर करत, आरोपीला काही करायचे होते का? हा एक कट आहे का? याचा तपास करायचा असल्याचे कोर्टाला सांगितले. मात्र तो मुद्दाही आरोपीच्या वकीलांनी खोडला. परंतु कोर्टाला हा मुद्दा योग्य वाटल्यानंतर कोर्टाने आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+