मोठी उलथापालथ ! दोन बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार, शरद पवार गटालाही धक्का बसणार
राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठी राजकीय खेळी खेळण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे नेते-धुळे येथील माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे अपूर्व हिरे-यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही येत्या 1 जुलै रोजी होणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य प्रदेशाध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात भाजपमध्ये औपचारिकरित्या सहभागी होतील, असे सांगण्यात येते.

कुणाल पाटील यांचा भाजपकडे झुकाव
काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील माजी आमदार आणि प्रभावशाली नेते कुणाल पाटील यांनी अखेर भाजपच्या दिशेने पावले टाकली आहेत. काँग्रेससोबत अनेक वर्षांपासून राहिलेल्या पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे धुळ्यात भाजपला मोठा बळकटीचा फायदा होईल, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. पाटील हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जात होते. मात्र आता त्यांनी काँग्रेसला अलविदा करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अपूर्व हिरे यांचा प्रवेश म्हणजे अंतर्गत संघर्षाची प्रतिक्रिया?
शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी 2019 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आता त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सीमा हिरे यांनी स्वतः हिरे यांच्या प्रवेशाचं स्वागत केलं आहे, विशेष म्हणजे याचा उपयोग पक्षांतर्गत प्रतिस्पर्धा असलेल्या सुधाकर बडगुजर यांना तोल देण्यासाठी होणार असल्याचे बोलले जात आहे.
नाशिकमधील ठाकरे गटाला लागलेले धक्के
अलीकडच्या काळात ठाकरे गटाला नाशिक जिल्ह्यातून सलग धक्के बसत आहेत. आधी सुधाकर बडगुजर, त्यानंतर विलास शिंदे या दोन स्थानिक नेत्यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. या पार्श्वभूमीवर अपूर्व हिरे यांचा प्रवेश ठाकरेंना आणखी कमजोर करणारा ठरू शकतो. नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या या हालचाली मोठा राजकीय फरक घडवू शकतात.
विजय भांबळेंचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश
दरम्यान, काँग्रेसशी संबंधित राहिलेले माजी आमदार विजय भांबळे हे देखील राजकीय घराणं बदलत आहेत. शरद पवार यांची साथ सोडून भांबळे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सेलू-जिंतूर मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. नवाब मलिक यांच्या प्रयत्नांमुळे हा पक्षप्रवेश घडत असल्याची चर्चा आहे. मुंबईतील महिला विकास महामंडळ कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडणार असून त्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
युद्धामुळे सोन्याच्या दराचा भडका! 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.63 लाखांच्या पार; पहा मुंबई-पुण्यातील रेट -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे 5 ऐतिहासिक निर्णय; शेअर करा अभिवादन संदेश -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
ना पाणी, ना लिफ्ट; असुविधांचा डोंगर! म्हाडाच्या प्लॅटधारकांचा टाहो; रजिस्ट्रीची घाई पण सोयींची वाणवा











Click it and Unblock the Notifications