कुस्ती क्षेत्राला हादरवणारी बातमी; कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकमने संपवलं जीवन
सांगली : अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला सांगलीच्या नागनाथनगर येथील सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पै. सुरज जनार्दन निकम यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पै.सुरज निकम हा वडिलांच्या निधनानंतर व्यथीत होता. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नागेवाडी येथील जुन्या राहत्या घरातील एका खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याचे मामा भास्कर जोतीराम जाधव यांनी पै. सुरज याला विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सूरज निकम याने 'कुमार महाराष्ट्र केसरी' खिताब पटकावला होता. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमच्या आत्महत्येमुळे सांगली जिल्ह्यात शोककळा पसरल्याचं दिसतं आहे.
सूरज निकमचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. त्याच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. कुस्ती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा हा मल्ल काळाच्या पडद्याआड गेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवली. अशा या आत्महत्येच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications