Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात नीलेश राणेंचा 8,176 मतांनी विजय, वैभव नाईकांचा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत अखेर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा 8 हजार 176 मताधिक्याने पराभव करीत या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला.

या विजयामुळे नीलेश राणे हे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या 2014 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा दहा वर्षांनंतर या मतदारसंघाचे आमदार झाले. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत काढून या मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे धनुष्यबाण अबाधित ठेवले.

Maharashtra Assembly Election 2024

साक्षात नारायण राणे यांना पराभूत करणारी जायंट किलर आमदार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांच्या थेट लढतीमुळे संपूर्ण कोकणात चर्चिल्या गेलेल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात अखेरीस नीलेश राणे यांनीच बाजी मारली. हा विजय नारायण राणे यांच्यासाठी प्रचंड दिलासा देणारा विजय आहे.

वैभव नाईक या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. 2009 सालापासून ते या मतदारसंघात मेहनत घेत आहेत. 2009 साली नारायण राणे यांच्या विरोधात त्यांचा वीस हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला. पण नेटाने संघटना बांधणी करीत वैभव नाईक यांनी किल्ला लढवत ठेवला. 2014 साली केंद्रात मोदींची लाट होती आणि राज्यात देखील भाजपची चलती होती. शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढत असले तरी मतदारांनी राणी यांच्या विरोधात मतदान केले आणि वैभव नाईक दहा हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आले. तेव्हापासून ते जायंट किलर म्हणून ओळखले जाऊ लागले. 2019 साली देखील वैभव नाईक यांनी राणे यांचे विश्वासू कार्यकर्ते रणजीत देसाई यांचा 12000 च्या मताधिक्क्याने पराभव केला.

2024 साली महाराष्ट्राचा राजकीय पट पूर्णपणे बदललेला होता. नारायण राणे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर खासदार झाले. राणी यांचे धात्य पुत्र नितेश राणे हे शेजारच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांना कणकवलीतून तिकीट मिळणारे निश्चित होते. थोरले पुत्र काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले माजी खासदार निलेश राणे यांचा 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची नारायण राणे यांना चिंता होती. एकाच घरातील तिघांना भाजपकडून तिकीट मिळणे अशक्य होते. त्यामुळे निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली.

ही लढत चुरशीची होणार हे स्पष्ट होते. निलेश राणे यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपली फौज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात उतरवली होती. सुषमा अंधारे, संतोष कोळी अशा आक्रमक नेत्यांच्या सभा या मतदारसंघात झाल्या. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिव पुतळा मोठ्या पावसात कोसळल्यामुळे तो प्रचाराचा मोठा मुद्दा झाला होता. त्या मुद्द्याचा राजकीय लाभ वैभव नाईक यांना होण्याची शक्यता होती. हिरवी अत्यंत आक्रमक म्हणून ओळखले जाणारे निलेश राणे नितेश राणे आणि नारायण राणे या तिघांनीही विधानसभा निवडणुकीत अत्यंत शांतपणे टीकेचे वार सहन केले. निलेश राणे यांचे विजयासाठी भाजप आणि शिवसेना एकत्रित प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद नसल्यामुळे वैभव नाही एकाकी पडले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+